शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲपवर लग्नाची पत्रिका उघडण्यापूर्वी सावधान! एपीके फाईलद्वारे होतोय नवीन फ्रॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:42 IST

Bhandara : सायबर दरोडेखोर मोबाइल मॅसेजिंग सिस्टिम हॅक करून गुगल पे, फोन पे पेमेंट ॲपचाही घेतात ताबा

लोकमत न्यूज नेटवर्क वाकेश्वर: ऑनलाइन पत्रिकेच्या माध्यमातून व्हायरस मोबाइलमध्ये शिरवून अनेकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला आहे. लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्नाची पत्रिका व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर पाठवण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. लग्नपत्रिका पाठवण्याचा हाच सोपा मार्ग समजला जातो. पण लग्नाची हीच पत्रिका आता लुटीचं माध्यम बनली आहे. आतापर्यंत बँकेतून बोलतोय किंवा तुमचं बैंक खातं बंद होईल अशी भीती दाखवून तुमच्या बँक खात्यांची माहिती मिळवली जात होती. पण आता सायबर भामट्यांनी लुटीसाठी नवी क्लृप्ती शोधून काढलीय. चक्क लग्नाची एपीके फाइल पाठवून मोबाइलधारकांच्या लुटीचा नवा फंडा सुरू केला आहे.

उत्सुकतेपोटी आलेली लग्नपत्रिका आपण कोणत्याही खात्रीशिवाय उघडतो. लग्नपत्रिकेच्या नावाखाली आलेला व्हायरस आपल्या मोबाइलमध्ये शिरतो. एकदा का मोबाइलमध्ये लग्नाची एपीके फाइल उघडली की व्हायरस आपलं काम करण्यास सुरुवात करतो. लग्नपत्रिका उघडल्यावर अगदी काहीवेळात आपला मोबाइल बंद पडतो. आपण जेव्हा फोन पुन्हा सुरु करतो तोपर्यंत मोबाइलमधील सगळ्या सेटिंग्ज बिघडलेल्या असतात. 

याचवेळी सायबर दरोडेखोर मोबाइल मॅसेजिंग सिस्टिम हॅक करतात. गुगल पे, फोन पे या पेमेंट ॲपचाही ताबा घेतात. इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पासवर्ड मिळवले जातात. फोटो गॅलरीतले फोटोही सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात. काही घटनांमध्ये मोबाइलमध्ये सेव्ह केलेल्या आधार कार्ड, पॅन कार्डचाही गैरवापर केला जातो. 

सायबर गुन्हेगार बँक खात्यातल्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. बैंक अकाउंट रिकामं केले जाते. गुगल पे आणि फोन पेवरून ऑनलाइन खरेदीही केली जाते. ऑनलाइन क्रेडिट कार्डाचा वापर परदेशात खरेदी करण्यासाठी वापरला जातो. याचा पत्ताही लागत नाही. कारण खरेदीचे अलर्ट देणारी मॅसेजिंग यंत्रणाही त्यांनी ताब्यात घेतलेली असते. 

खात्री करून घ्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून आलेली लग्नपत्रिका उघडू नका. एपीके फॉरमॅटमधील फाइल उघडण्याचा विचारच करू नका. एखाद्या मित्राची नातेवाइकाच्या नावे लग्नपत्रिका आल्यास पहिल्यांदा फोन करून खात्री करून घ्या. अन्यथा मित्र आणि नातेवाइकाच्या लग्नाच्या आनंदात तुम्ही कंगाल व्हाल.

टॅग्स :fraudधोकेबाजीbhandara-acभंडारा