शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

सावधान ! एटीएमधारकांचे खाते असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:01 IST

जुने किंवा नवीन एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, अशी बतावणी करून बँक ग्राहकांना व्यवस्थापकांच्या नावानिशी फोन करून आॅनलाईन गंडा घालण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जनजागृती अभावी आॅनलाईन लुटारुंनी शहरासह ग्रामीण भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न : शहरासह ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रीत, अनेकांना येत आहेत मोबाईलवर कॉल

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुने किंवा नवीन एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, अशी बतावणी करून बँक ग्राहकांना व्यवस्थापकांच्या नावानिशी फोन करून आॅनलाईन गंडा घालण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जनजागृती अभावी आॅनलाईन लुटारुंनी शहरासह ग्रामीण भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.आधुनिक जीवन पद्धतीत सतत बदल होत असताना तंत्रज्ञानाच्या युगात कुठलीही बाब आता अशक्य राहिलेली नाही. मोबाईल प्रत्येकाच्या हातातले खेळणे बनले असून याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच संचार माध्यमाचा शस्त्रासारखा वापर करून ग्राहकांना लुबाडण्याचे कार्य जिल्ह्यात खुलेआम सुरु आहे. सायबर क्राईमचा धाक आम्हाला नाही असाच आव दाखवून हा प्रकार राजरोसपणे सुुरु आहे. आयपी अ‍ॅड्रेस किंवा आॅनलाईन व्यवहारात सहजासहजी आपण पकडले जाणार नाहीत याची हमखास गॅरंटी असल्यानेच दिवसेंगणिक आॅनलाईन व्यवहारात लुबाडण्याचे प्रमाण वाढले आहेत. अनेक ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत.अशी होते फसवणूकशहरात काही प्रमाणात जनजागृती असली तरी ग्रामीण क्षेत्रात एटीएम हाताळण्याबाबत हवी तशी सतर्कता घेतलर जात नाही. मोबाईलवर किंवा अन्य संचार माध्यमाचा वापर करून बँक ग्राहकाला सरळ कॉल केले जाते. यात ‘आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते सुरु करण्यासाठी एटीएम कार्डचा नंबर, सीवीसी नंबर व त्यानंतर ओटीपी विचारला जातो.’ फोन करणारा व्यक्ती समोरच्याच्या हावभाव लक्षात घेऊन बोलत असल्याने बँक ग्राहक सहजरित्या त्यांच्या जाळ्यात अडकतो. विशेष म्हणजे आता तर आॅनलाईनचा गंडा घालणाऱ्यांकडे एटीएम कार्ड नंबरसह कार्डची एक्पायरी डेटही उपलब्ध झाली आहे. फक्त सीव्हीसी कोड व वनटाईम पासवर्ड (ओटीपी) मिळविण्यासाठी एटीएम धारकाला फोन करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच ग्राहकांची शुद्ध फसवणूक होत आहे. अशा प्रकारात बँका मात्र हात वर करीत आहेत.जनजागृतीचा अभावविविध बँकांनी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यमान स्थितीत ग्रीन पीनचा वापर करणारे एटीएम कार्डच चलनात आले आहेत. मात्र आॅनलाईन व्यवहारात एटीएम कार्डनंबर व सीव्हीसीचा वापर अत्यंत सावधगिरीने करावा, अशी जनजागृती जिल्हा पोलिसांसह बँकांनी अनेकदा केली आहे. याबाबत मोहीमही सातत्याने राबविली जात आहे. मात्र माहितीअभावी अजूनही लहान मोठे मासे आॅनलाईनचा गंडा घालणाऱ्यांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत.कुठलीही बँक किंवा आस्थापना बँकेची कुठलीही माहिती ग्राहकाला विचारीत नाही. जिल्ह्यात घडणाºया आॅनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे यात या फसवणूक करणाऱ्यांचे आंतरराज्यीय कनेक्शन असून त्यांची पाळेमुळे देशभरात पसरली आहेत. अशावेळी नागरिकांनी सावध राहणेच हाच प्राथमिक उपचार आहे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.