शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कीडनाशकाबाबत काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 9:18 PM

जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून या जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे मार्गदर्शन : यवतमाळच्या घटनेनंतर दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून या जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ७१४.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. १ लाख ५१ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी करण्यात आली.वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता यामुळे भात पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव आहे.त्यामुळे पीक संरक्षणासाठी शेतकºयांनी फवारणी सुरू केली आहे. पिकावरील कीड व रोग यांचे नियंत्रण करताना किडनाशके वापरताना ती काळजीपूर्वक हाताळणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.किडनाशके फवारतांना रासायनिक औषधाचे बारीक कण हवेबरोबर नाक, तोंड, त्वचा किंवा डोळ्याद्वारे शरीरात जाते. त्यामुळे जीवास हानी पोहचू शकते. यासाठी किडनाशके वापरण्यापूर्वी लेबल व माहिती वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करा. जोराचा वारा वाहत असल्यास फवारणी टाळावी. फवारणीचे वेळी तंबाखू, बिडी, गुटखा, पान आदींचे सेवन करु नये. तणनाशके व कीडनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा तसेच गळते फवारणी यंत्र न वापरता दुरु स्त करु न वापरावे. फवारणी करतेवेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. फवारणी झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. कीटकनाशकाच्या बाटल्या वापरानंतर नष्ट कराव्यात.डोळ्यांची घ्या काळजीडोळ्यात कीटकनाशके गेल्यास ताबडतोब पाण्याचा प्रवाह डोळ्यात सोडून डोळे धुवावेत. डॉक्टर येईपर्यंत सतत डोळे धूत राहावे. किडनाशकाची फवारणी करताना किडनाशक पोटात जाऊन विषबाधा झाल्यास तत्काळ डॉक्टराला बोलवावे. तोपर्यंत पोटात गेलेले विष बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या. श्वसनाद्वारे विषबाधा झाल्यास रु ग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत ठेवावे. रोग्याला घाम येत असल्यास स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसावे. किडनाशके फवारणी करताना शेतकरी बांधवांनी अशाप्रकारे विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.या गोष्टींसाठी संरक्षण आवश्यकधोकादायक किडनाशके वापरताना संरक्षण कपडे जसे रबरी हातमोजे, चष्मा, रबरी बुट, लांब पायजामा घालावा व फवारणी सहा तासापेक्षा जास्त वेळ करु नये. किटकनाशके पोटात गेले असल्यास प्रथमोपचारासाठी पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यासाठी भाग पाडावे. त्यासाठी १५ ग्रॅम मीठ, ग्लासभर कोमट पाण्यातून पिण्यास द्यावे. उलटीद्वारे पाणी स्वच्छ येईपर्यंत ही कृती करावी. हाताची बोटे अथवा चमच्याचा टोकाकडील भाग घशात घालूनही उलट्या करु न घ्याव्यात. जर रोग्याला सारख्या उलट्या होत असतील तर वरील उपचार करु नये. श्वसनाद्वारे किडनाशकाची विषबाधा झाली असल्यासरु ग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे. खिडक्या व द्वारे उघडावे.रु ग्णाचे कपडे सैल करावे. श्वासोच्छवास नियमित होत नसल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दयावा. त्वचेवर किडनाशके पडल्यास त्वचा साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवून काढावी.