शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बावनथडी धरण अद्याप ‘मृतसाठ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:02 IST

बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची पाठ : २५ वर्षात पहिल्यांदाच असे चित्र

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस बरसला नसल्याने धरणात अद्यापही मृतसाठाच आहे. उपयुक्त साठ्यासाठी पाणी पातळी किमान पाच सेंमीने वाढण्याची गरज असून गत दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे यंदा बावनथडी प्रकल्प कोरडा तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुमसर-मोहाडी व मध्यप्रदेशाला वरदान ठरणारा बावनथडी (राजीवसागर) धरणात पावसाळ्यातही मृतसाठाच असल्याची धक्कादायक माहिती आहे. धरणक्षेत्र तथा बावनथडी नदी उगम परिसरात पुरेसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा झाला नाही. उपयुक्त साठ्यासाठी पुन्हा पाच सेंमी पातळी वाढण्याची आवश्यकत आहे. धरण क्षेत्रात केव्हा पाऊस बरसतो याची प्रतीक्षा शेतकरी तथा संबंधित अधिकारी वर्गाला आहे. गत २५ वर्षात बावनथडीला पावसाळ्यात पाणी नाही, असे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३३ वक्राकार दरवाजे उघडण्याची वेळ प्रकल्प प्रशासनावर आली आहे तर दुसरीकडे बावनथडी धरणात अद्यापही मृतसाठा आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर शेती सिंचनाची सोय एकट्या बावनथडी प्रकल्पावर पूर्ण होते. हा प्रकल्प पुर्णक्षमतेने भरला नाही तर भीषण स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.नदीजोड प्रकल्पाची गरजवैनगंगा व बावनथडी या दोन प्रमुख नद्या आहेत वैनगंगा नदीवर गोसेधरण बांधण्यात आले. प्रकल्पाचे बॅकवाटर भंडारा शहरापर्यंत येते. भर उन्हाळ्यातही येथील जलस्तर कमी होत नाही. दुसरीकडे बावनथडी नदी पावसाळा वगळला तर आठ ते दहा महिने कोरडीच राहते. त्यामुळे नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज आहे. नदीजवळ प्रकल्प राबविल्यास बावनथडी नदीतही बाराही महिने पाणी खळखळत राहू शकते. त्यामुळे नदीवर सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची.बावनथडी नदी कोरडी पडण्याची भीतीवैनगंगा नदीला बावनथडी नदी बपेराजवळ येवून मिळते. वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे बॅरेज तयार करण्यात आले आहे. वैनगंगा नदीला या हंगामात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु बावनथडी नदी मात्र कोरडीच असल्याचे चित्र आहे. पाऊस न बरसल्याने सर्वच जण हतबल झाले आहे. केवळ सिहोरा परिसरातील चांदपूर जलाशयातून पाणी विसर्ग करण्यात आले. आगामी काळात पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.बावनथडी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात मृतसाठा आहे. पाच सेंमीने पाणी पातळी वाढली तर उपयुक्त पाणीसाठा होईल. अद्याप येथे पावसाची प्रतीक्षा आहे.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प.नैसर्गीक संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमीची कामे करण्याची गरज आहे. पावसाअभावी शेती होणार नाही. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करावे.-डॉ. पंकज कारेमोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प