शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी संघर्ष समितीची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:05 IST

तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून समस्या जैसे थेच आहेत.

ठळक मुद्देचर्चा निष्फळ : निवडणुकीवर बहिष्कार कायम, १५ गावांना सिंचन व पाणीपुरवठा समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून समस्या जैसे थेच आहेत. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांसह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय बावनथडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.गोबरवाही परिसरातील १२ व आलेसुर, गोंडीटोला व विटपूर या आदिवासी बहुल गावांना मागील १२ वर्षापासून बावनथडी प्रकल्पातून शेतीकरिता सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. पाणीपुरवठा योजना जरी पूर्णत्वास आल्याचा दावा करण्यात आला. परंतु ग्रामस्थांना अजुनपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला नाही. मागील अनेक वर्षापासून शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या सुटल्या नाही. तांत्रिक कारणे पुढे करून प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप बावनथडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लावला.तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्प आहे. प्रकल्पापासून १५ गावे तीन ते दहा कि़मी. अंतरावर आहेत. ही गावे उंच भागी असल्याने या गावांना शेतीकरिता पाणी मिळत नाही. स्थापत्य अभियंत्यांनी तशी माहिती दिली. शेती सिंचनाकरिता उपसा सिंचन योजना हे एकमेव पर्याय असल्याचे यावेळी बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत सांगितले. सदर गावांना प्रवाही सिंचनाची सोय होण्याकरिता मोठी तांत्रिक अडचण आहे. उपसा सिंचन योजना पवनारखारी येथे तयार व्हावी याकरिता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आले. बावनथडी संघर्ष समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांत चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे येणाºया लोकसभा व इतर सर्व निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचा निर्णय संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतला.बैठकीला उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.के. गेडाम, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता ए.जी. जिभकाटे, नायब तहसीलदार निलेश गोंड, बावनथडी संघर्ष समितीचे आनंद जायस्वाल, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण गाढवे, दर्शन माधवानी, शरद खोब्रागडे, देवेंद्र अवथरे, अनिल टेकामसह पदाधिकारी उपस्थित होते.१२ गावे उंच भागात वसली असल्याने प्रवाही सिंचन शेतीला होऊ शकत नाही. पवनारखारी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.-एस.के. गेडाम, कार्यकारी अभियंता बावनथडी प्रकल्प.१५ गावांची समस्या कशी सोडविता येईल याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याची माहिती संबंधित विभागाकडून जाणून घेतली. समस्येविषयी जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून शासनाशी पत्रव्यवहार करण्यात येईल. निवडणुकीवर बहिष्कार घालू नये.-स्मिता पाटील, उपविभागीय अधिकारी तुमसर.मागील १५ वर्षापासून शेती व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. केवळ तांत्रिक कारणे पुढे केली जातात. आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय बावनथडी संघर्ष समितीने घेतला आहे. निवडणुकीवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग आहे.-बाळकृष्ण गाढवे, बावनथडी संघर्ष समिती गोबरवाही.