शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

बावनथडी प्रकल्प शाप की वरदान?

By admin | Updated: July 25, 2016 00:43 IST

सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे

शेतकऱ्यांचा प्रश्न : आष्टी कालव्याचे बांधकाम थंडबस्त्यातराहुल भुतांगे तुमसरसिंचनाच्या माध्यमातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, याकरिता शासन विविध योजना अमलात आणत आहे. परंतु शासनाच्या अती दिरंगाई वृत्तीमुळे या योजना शेतकऱ्यांना अभिशाप ठरू लागल्या आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण आष्टी वितरिकेबाबद पहावयास मिळत आहेत.तालुक्यातील अती महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बावनथडी परियोजनेची ओळख आहे. परियोजनेत गळभरणी करून पाणी साठवण्याची प्रक्रिया गत तीन चार वर्षापूर्वी सुरु आहे. परंतु राजापूर वितरिकेचे काम सन २००१ पासून सुरु होवूनही अद्याप काम अर्धवटच आहे. त्याच स्थितीत आहे. बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून राजापूर वितरिका ही लेंडेझरी, आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी (बुज.), लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, राजापूर आदी गावांना नहरावाटे सिंचनाकरिता पाणी वाटपाचे काम करणारी आहे. परंतु अजूनपर्यंत नहर खोदकाम व नहर बांधकाम झालेच नसल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, राजापूर येथील शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून तर वंचित आहेतच. त्या उपरही मागील सात वर्षापासून नहराकरिता जमीन अधिग्रहण केली. त्या जमिनीलगत ३ मिटर रुंदीच्या व ३ मिटर खोल खड्डे खोदून अधिकची जागा हस्तगत केल्या गेली आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचल्याने शेतजमिनीचे भूस्खलन होणे सुरु आहे. त्यामुळे खड्याचे स्वरुप तर वाढलेच. परंतु ऊसाची शेतीही नष्ट होत आहे. यामध्ये आष्टी येथील शेतकरी मनीराम गौपाले, लक्ष्मण गौपाले, शत्रूघ्न गौपाले, रामप्रसाद गौपाले, श्रीराम मेश्राम, रुपचंद सोनवाने, शामराव झोळे आदी शेतकरी प्रभावित झाले आहेत. नहर गावाशेजारातून जात असल्यामुळे विभागामार्फत खड्डे खोदण्यात आले. या खड्यात गावातील छोटे मोठे मुलं पोहणे, खेळण्यासाठी उतरत असतात. तिथे कधीही जीवीत हानी होवू शकते. याकरिता खड्डे बुजविण्यात यावे,म्हणून विभागाचे अभियंता चौरागडे व नागपुरे यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु निवेदनाची साधी दखल घेण्याचे सौजन्यही विभागाने दाखविले नाही. उलट शेतकऱ्यांना कंत्राटदारामार्फत धमकावणे सुरुच आहे. लाभ, मोबदला देणे तर सोडाच शेतकऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने बावनथडी परियोजना आष्टीतील शेतकऱ्यांकरिता अभिशाप ठरू लागली आहे.