शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

चंद्रमोळी झोपळीतील कचराबाईला हवा घरकुलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

करडी(पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील फाटक्या चंद्रमोळी झोपडीत राहणारी कचराबाई हरीराम गाढवे ही विधवा महिला प्रशासनाच्या निष्ठूरतेची बळी ...

करडी(पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील फाटक्या चंद्रमोळी झोपडीत राहणारी कचराबाई हरीराम गाढवे ही विधवा महिला प्रशासनाच्या निष्ठूरतेची बळी ठरली आहे. गत २० वर्षांपासून ती घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. गरजवंताच्या पहिल्या श्रेणीसाठी पात्र असतानाही ग्रामपंचायत स्तरावरून लाभ देण्यात आले नाही. सन २०११ मध्ये झालेल्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणातही तिच्यावर अन्याय झाला. झोपडीत असतानाही ''ब'' घरकुल यादीत तिचे नाव नाही. प्रशासनाच्या उदासिनतेचा फटका तिला आजही सहन करावा लागतो आहे.

करडी येथील इंदिरा नगर आंबेडकर वार्डात राहणारी कचराबाई हरीराम गाढवे ही विधवा महिला आपल्या वृद्ध आईच्या सोबतीला राहते. तिला मुलंबाळं नाहीत. त्यातच कचराबाईची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. काठ्यांचा आधार देऊन प्लास्टिकच्या फाटक्या कागदात दिवस काढीत आहे. दोन घास खाण्याचे वांदे आहेत. तळहातावर कमावणे व पानांवर खाऊन जीवनयापन करीत आहे. घर बांधण्याचे आर्थिक बळ त्यांच्याकडे नाही; मात्र मरणाच्या अगोदर हक्काचे घर असावे, ही त्यांची इच्छा आहे.

२० वर्षांपासून कचराबाई पडक्या झोपडीत राहतात. अनेकदा त्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती मोहाडी येथे घरकुलासाठी अर्ज दिला; परंतु प्रशासनाला जाग आलेली नाही. तीन वर्षांपूर्वी कचराबाईला इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुल मिळण्याकरिता करडी ग्रामवासियांनी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने तत्काळ घरकुल देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; परंतु आश्वासनाची पूर्तता अजूनही झालेली नाही. कचराबाईचे नाव घरकुलसाठी पात्र असलेल्या ''ब'' यादीत नाही. त्यामुळे घरकुल देता येत नाही, असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात; परंतु पंचायत समिती व वरिष्ठ स्तरावर मागणी लावून धरण्याचे सौजन्य त्यांनी एकदाही दाखविले नाही. त्यामुळे कचराबाई अजूनही पडलेल्या झोपडीत राहण्यास मजबूर आहे.

बॉक्स

मोहाडी तालुक्याला ११६९ घरकुलांचा लक्षांक प्राप्त

२०२२ पर्यंत सर्वांना घरकुल हे शासनाचे धोरण आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून ‘ब’ यादीत पात्र ठरलेल्या सर्वांना घरकुल देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. दिवाळीनंतर ''ड'' घरकुल यादीत नाव असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना ''ड'' यादीतील घरकुलाचा लक्षांक प्राप्त झालेला आहे. मोहाडी तालुक्यात सुमारे ११६९ घरकुलांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. गरिबांना हक्काचा निवारा मिळावा, या दृष्टीने प्रशासनाने कामकाजाचा वेग वाढविण्याच्या व कामात सुधारणा आणि पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.

कोट

निराधार असलेल्या कचराबाई गाढवे या विधवा महिलेचे नाव घरकुलच्या ''ब'' यादीत नाही. पुरवणी ''ड'' यादीत नाव आहे. दिवाळीपर्यंत ''ड'' यादीतील घरकुल सुरू होताच तत्काळ घरकुलचा लाभ देता येईल.

- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीमुळे कचराबाईचे नुकसान झाले. जेव्हा ग्रामवासीयांनी तिच्यासाठी उपोषण केले. त्यावेळीसुद्धा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. ''ड'' यादी सुरू होताच लाभ न मिळाल्यास आंदोलन केले जाईल.

- ज्ञानेश्वर ढेंगे, सामाजिक कार्यकर्ता करडी.