शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

३१ जुलैनंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजुर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये असे, निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

ठळक मुद्देविषय कर्जमाफी : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजुर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये असे, निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. भंडारा जिल्ह्यातील १० भातगिरण्यांच्या सक्षमीकरणाचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावे. प्रत्येक तालुक्यात बाजार समितीच्या ठिकाणी एक तुर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी आ. चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सहकार मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रविण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.ना. देशमुख यांनी महाकर्जमाफी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी विकास संस्था यासह विविध विषयाचा आढावा घेतला. भंडारा जिल्ह्यात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक मिळून थकीत शेतकरी, प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणारे लाभार्थी व एकरकमी योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेले शेतकरी असे एकूण ४९ हजार ३७५ कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांना १४३ कोटी ३२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. मंजूर कर्ज खात्यावर बँकांनी कुठलेही व्याज आकारु नये असे स्पष्ट निर्देश सहकार मंत्री यांनी दिले. तसेच राज्यस्तरावर एसएलबीसी यांच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले. त्याचे तंतोतंत पालन करावे यावर त्यांनी विशेष भर दिला.तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पायाभूत सूविधांसाठी दीड कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठविल्याचा विषय मांडण्यात आला. यावर बोलतांना मंत्री म्हणाले की, या विषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील १० भात गिरण्यांच्या सक्षमीकरणाचे प्रस्ताव पणन संचालकांकडे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे तातडीने पाठविण्यात यावे. अशा सूचना त्यांनी दिल्या.