शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील गिट्टी उखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:33 IST

चान्ना-कोडका ते पांढरवाणी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. आता रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.

ठळक मुद्देचान्ना-कोडका ते पांढरवाणी मार्ग : डांबरीकरण व रुंदीकरणाची ग्रामवासीयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : चान्ना-कोडका ते पांढरवाणी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. आता रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. सध्या हा मार्ग एकेरी मार्ग आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी चान्ना, कोडका, पांढरवाणी, परसोडी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.चान्ना, कोडका गावाचा परसोडी (रैय्यत) या गट ग्रामपंचायतमध्ये समावेश होतो. पांढरवाणी गावावरुन परसोडी (रैय्यत) येथे ग्रामपंचायतीचे विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी जावे लागते. तसेच तलाठी कार्यालय पांढरवाणी येथे सुद्धा या मार्गाने जावे लागते. चान्ना, कोडका ते पांढरवाणी हा मार्ग एकेरी मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीला फारच अडचण होते. पावसाळ्यात या मार्गाने ये-जा म्हणजे तारेवरची कसरत असते. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. त्यावेळी फक्त अर्धा किलोमीटर रस्त्याचेच खडीकरण करण्यात आले होते. अडीच किलो मीटरचे रस्ता डांबरीकरण करणे कंत्राटदाराने सोडून दिले होते. या रस्त्यावरील गिट्टी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. एकेरी वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, असे सुनील उरकुडे व इतर ग्रामवासीयांनी सांगितले.पांढरवाणी, परसोडी, कोकणा येथील गावकऱ्यांना साकोली, सानगडी, लाखांदूर या गावांकडे जायला हा रस्ता जवळ होतो. त्यामुळे या गावातील ग्रामवासीयांची गैरसोय होत आहे.चान्ना-कोडका ते पांढरवाणी या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी चान्ना-कोडका, पांढरवाणी, सालई, परसोडी, कोकणा येथील ग्रामवासीयांनी केली आहे.बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.अनेकदा या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करण्यात आली. एकेरी रस्ता असल्यामुळे रहदारीला फारच अडचण होते. एकावेळी एकच वाहन या रस्त्याने जाऊ शकते. पावसाळ्यात या रस्त्याने जाणे-येणे जिकरीचे होते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे.-सुनील उरकुडे, ग्रामस्थ, चान्ना-कोडका.