शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:45 IST

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली.

ठळक मुद्देशेळ्यांच्या कळपावर हल्ला : पवनारा परिसरात भीती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली. वनविभागाने या परिसरात कॅमेरे लावले असून तलाव तथा बावनथडी कालवा परिसरात नागरिकांनी जावू नये म्हणून दवंडी दिली आहे.बघेडा येथील अर्जुन रामपाल ठाकूर (६०) हा आपल्या शेळ्या चारण्यासाठी तलाव परिसरात गुरूवारी गेला होता. त्यावेळी एका पट्टेदार वाघाने अचानक हल्ल करून शेळी ठार मारली. या शेळीला ओढत जंगलातील कालव्याच्या सिमेंट पाईपमध्ये बस्तान मांडले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावरून वनरक्षक राकेश फोंदाने यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सिमेंटच्या पाईपमध्ये बसलेला वाघ आणि त्याच्याजवळ शिकार केलेली शेळी दिसून आली. या परिसरात वनविभागाने कॅमेरे लावले असून रात्री उशिरा वाघ त्याठिकाणावरून निघून दुसरीकडे गेला.या प्रकाराने बघेडा व पवनारा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी या परिसरात जावू नये, अशी दवंडी देण्यात आली आहे. नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पTigerवाघ