शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे.  २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे.

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असताना त्यात अंतर्भूत असलेल्या बाबींकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे आता उघड झाले आहे. गोसेच्या बॅकवॉटरचा फटका भंडारा शहराला बसत असून, सुरक्षा भिंतीच्या सदोष नियोजन असल्याचे समोर आले आहे. योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे. २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भंडारा शहराला बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून दीड दशकापूर्वी भंडारा शहराच्या सभोवताल सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते त्यावेळी सुरू झालेले बांधकाम सदोष नियोजनामुळे पूर्ण झाले नाही. आता १ नोव्हेंबर २०२१ पासून वैनगंगा नदीचा जलस्त्रोतात सातत्याने वाढत आहे.ठराविक मर्यादेपर्यंत पाण्याची पातळी वाढविण्यात येत असल्याने पूर्व मध्य भागातील वस्तीमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अंडरग्राउंड बोगद्यातून बॅकवॉटर ग्रामसेवक कॉलनी ते भंडारा-वरठीपर्यंतच्या शिवारात साचले जात आहे. एकीकडे काेट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन सुरक्षाभिंत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे आता चक्क नागरिकांच्या जीवाशीच खेळ सुरु आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोट्यवधीचा चुराडा- शहराच्या सभोवताल ते पिंडकेपारपर्यंत असा एकूण दहा किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा या प्रस्तावित बांधकामाची किंमत जवळपास ९० कोटींच्या घरात होते. या भिंतीचे बांधकाम दशकभारपेक्षा जास्त कालावधीपासून पूर्णतः थांबले आहे. खऱ्या अर्थाने  भिंतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर तर शहरात शिरलेत यासोबतच असंख्य समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. ९० कोटींचे बांधकाम आता २०० कोटींच्या वर पोहोचले असताना कोट्यवधींचा चुराडा करून उपयोग काय? असेही नागरिक बोलू लागले आहेत.  

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प