शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

बाबासाहेबांच्या विचार, संघर्षाची मांडणी आवश्यक

By admin | Updated: January 18, 2017 00:23 IST

मानवी मुल्यांची प्रतिष्ठा आणि मानव मुक्तीकरिता आयुष्यभर जीवाचे रान करणारा प्रबुद्ध महामानव म्हणजे ...

शहापूर येथे भीम मेळावा : सुरेश माने यांचे प्रतिपादन, विविध कार्यक्रमांची रेलचेलशहापूर : मानवी मुल्यांची प्रतिष्ठा आणि मानव मुक्तीकरिता आयुष्यभर जीवाचे रान करणारा प्रबुद्ध महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्य समता आणि बेधुता हेच जिवनाचे तत्वज्ञान मानवाला बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक अशा सर्व पातळ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला, त्याला आधुनिक जगाच्या इतिहासात तोड नाही. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मिती करण्याकरिता त्यांच्या विचारांची, केलेल्या संघर्षांची योग्य मांडणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.भीम मेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात सुरू झालेल्या शहापूर येथील ऐतिहासिक ७३ व्या भीम मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने भीम मेळाव्याचे उद्घाटन अ‍ॅड.माने व अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारपीठावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष मोरेश्वर सुखदेवे, जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, साहित्यीक तु.का. कोचे, अध्यक्ष कादर, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष झेड.आर. दुधकुवर, भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष रंजित कोल्हटकर, उपविभागीय कृषि अधिकारी अविनाश कोटांगले, खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, शिक्षण महर्षि भाऊसाहेब गोस्वामी, डॉ. महेंद्र गणवीर, जि.प. चे माजी सभापती राजकपूर राऊत, सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे, संजय बन्सोड, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अल्का रंगारी, वैद्यकीय अधिकारी रेखा रामटेके, माजी सरपंच सुरेश गजभिये, दुर्याेधन खोब्रागडे, भिमराव मेश्राम, अ‍ॅड. अमर चवरे, भंतेगण, आरती रंगारी उपस्थित होते. मेळावाप्रसंगी मोरेश्वर सुखदेवे यांचा भीम मेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्टच्या वतीने मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. डॉ. सुरेश माने म्हणाले, प्रस्थापितांची दांभीक व दुटप्पी पणाची भूमिका ओळखपणे महत्वाचे आहे. बाहेरचे आणि आतले कोण याचे भान ठेवा. बौद्धीक दिवाळखोरीत जावू नका. चुकीच्या गोष्टी सांगून बाबासाहेबांचे महत्व कमी करू नका. इतिहासातील काही जावईशोध सांगून जनतेला भुलविण्याचे काम काही घटकांकडून होत आहे. ते थांबले पाहिजे. सकाळी भिक्खुनी संघप्रिया व भिक्खु संघ यांच्याद्वारा त्रिरत्न वंदना करण्यात आली. बौद्ध विहाराच्या प्रांगणात पंचशील ध्वजारोहण जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अल्का रंगारी, पोलीस पाटील धम्मपाल सुखदेवे, सोसायटी अध्यक्ष भीमराव भुरे, म.गांधी तंमुस अध्यक्ष अमर भुरे, अ‍ॅड. अमर चवरे, सुरेश गजभिये, प्रकाशबाबू गजभिये आदी उपस्थित होते. दिवारू वासनिक यांचेतर्फे भोजनदान वितरीत केल्यानंतर गावातील प्रमुख मार्गानी समता रैली काढण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या जयघोषाने व भीम गीतांनी शहापूर दणाणून गेले. यावेळी बौद्ध धर्मिय वधू-वर परिचय मेळावा व व्यसनमुक्ती मार्गदर्शन, बुद्ध भीम गीतांचेही आयोजन करण्यात आले होते. राहुल शिंदे व अश्विनी राजगुरू यांच्या समाज प्रबोधनपर भीम बुद्धावर आधारित मराठी, हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाकरिता मोरेश्वर गजभिये, मनोज चवरे, अशोक भिवगडे, जगदिश डोंगरे, आशिष रामटेके, मिलिंद खोब्रागडे, देवेंद्र रामटेके, तोताराम मेश्राम, तिर्थराज दुपारे, प्रशांत मेश्राम, रविंद्र बोरकर, अनमोल गजभिये, वृषभ गजभिये, अंकुर गजभिये, जितू फुले, संजय गजभिये, आशिर्वाद रामटेके, अभिजित वासनिक, शालिकराम मेश्राम, प्रकाशबाबू गजभिये, पांडूरंग बेलेकर यांच्यासह भीम मेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)