शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी धम्माचा प्रसार व प्रचार करून धम्मक्रांती घडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:03 IST

तथागत बुद्धांनीे वेद प्रामाण्य, यज्ञयांग, कर्मकांड, हिंसा, पशूबळी, विषमता व चातुवर्ण व्यवस्था नाकारून अहिंसा, समता, प्रज्ञा, शिल, करूणा, मैत्री व बंधुतेवर आधारित बौद्धधम्माची स्थापना करून आणि धम्माचा प्रचार व प्रसार करून प्रथमच धम्मक्रांती घडवून आणली.

ठळक मुद्देअमृत बन्सोड : जामगाव पुनर्वसन येथे धम्म प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तथागत बुद्धांनीे वेद प्रामाण्य, यज्ञयांग, कर्मकांड, हिंसा, पशूबळी, विषमता व चातुवर्ण व्यवस्था नाकारून अहिंसा, समता, प्रज्ञा, शिल, करूणा, मैत्री व बंधुतेवर आधारित बौद्धधम्माची स्थापना करून आणि धम्माचा प्रचार व प्रसार करून प्रथमच धम्मक्रांती घडवून आणली.सम्राट अशोक यांनीे देशविदेशात धम्माचा प्रचार व प्रसार केला. परंतु, सम्राट अशोकाचा पनतू सम्राट बृहद्रथ यांचा सेनापती पुष्यमित्र शुंगाने कपटाने खून करून धम्मक्रांती प्रतिक्रांतीत परावर्तीत केली.या देशात १२०० वर्ष बौद्ध धम्म नांदत होता त्यानंतर देशातून नामशेष झाला. त्यानंतर अडीच हजार वर्षानंतर बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा धम्मक्रांती घडवून आणली. परंतु, बाबासाहेबांची धम्मक्रांती आज विविध रुपात प्रतिक्रांतीच्या विळख्यात सापडली आहे. या प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी धम्मबंधूंनी सजग प्रहरी बनून एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता अमृत बन्सोड यांनी केले.महाबोधी उपासक संघ नागपूर व बुद्ध विहार चिचाळच्या संयुक्त विद्यमाने जामगाव पुनर्वसन येथे आयोजित १० दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिरात धम्मक्रांती-प्रतिक्रांती या विषयावर ते बोलत होते. अमृत बन्सोड म्हणाले, जेव्हा क्रांतीचा परिवर्तनाचा विचार रुजू होऊ लागते तेव्हा तो उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या प्रतिक्रांतीवादी शक्ती जोर धरू लागतात. या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी षडयंत्रकारी प्रवृत्तीचा शिका, संघटीत व्हा व संघर्ष करून संघटीतपणे मुकाबला केला पाहिजे. बाबासाहेबांची धम्मक्रांती न भुतो न भविष्यतो, अशी होती.या धम्मक्रांतीतूनच आज बौद्धीक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्रात्यांनी जन्म घेतला आहे. माणूसपणा हरवलेला माणूस आज बाबासाहेबांच्या बुद्धी वैभवाने जग पालथा घालत आहे, असे सांगितले.प्रास्ताविक व संचालन आयोजक लिमचंद बोधी बौद्ध यांनी, तर आभार जिवन बौद्ध यांनी मानले. शिबिराकरिता अरूण गोंडाणे, गुलाब घोडसे, वतन बौद्ध, ललित मेश्राम, संजय तिरपुडे, राजेश मेश्राम आदींनी सहकार्य केल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर