शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

बाबा जुमदेवजींनी माणुसकीची शिकवण दिली

By admin | Updated: December 25, 2016 00:46 IST

महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानवधर्माच्या सहाय्याने त्यांनी समाजातील अंधश्रद्धा,

नाना पटोले : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा कार्यक्रम, नाटक पुस्तिकेचे प्रकाशन कोंढा (कोसरा) : महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानवधर्माच्या सहाय्याने त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार नष्ट करण्याचे कार्य केले. मानवी जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वाईट व्यसनांना नष्ट करून दु:खी, गोरगरीब, पीडित लोकांना त्यांच्या दु:खातून मुक्त व माणुसकीची शिकवण दिली. त्यामुळे ते एक थोर समाजसुधारक होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. कोंढा येथे परमात्मा एक सेवक संमेलनात कसोटी नाटकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोंढा कोसराच्या सौजन्याने प्रा.दिपक नारायण जिभकाटे लिखीत कसोटी या नाटकाचे प्रकाशन व सेवक संमेलन आयोजित केले. या संमेलनाचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शेवंता जुगनाईके, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, पूर्ती समूह संचालक अनिल मेंढे, पवनी तालुका भाजपाध्यक्ष के.डी. मोटघरे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण जांभुळकर, दामोधर जिभकाटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाये, पंचायत समिती सदस्य कल्पना गभणे, प्रा. चरणदास बावणे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव कुर्झेकर, विनोद भुरे, धनराज जिभकाटे, मुनीर शेख, प्रकाश कुर्झेकर, प्रा.दिपक जिभकाटे, धनराज गभणे, शंकर वैद्य आणि बाहेरगावचे ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते. यावेळी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोंढा कोसरा तर्फे खासदार नाना पटोले व आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांना निवेदन देून बाबा जुमदेवजी यांच्या चरित्रावर आधारित पाठ नवीन अभ्यासक्रमात घेण्यासंबंधी शासन दरबारी प्रयत्न करावे तसेच ३ एप्रिल हा दिवस बाबा जुमदेवजी यांचा जन्मदिवस असल्याने त्या दिवशी शासनाने सरकारी सुटी जाहीर करावी, यासंबंधात प्रयत्न करण्याची विनंती केली. खासदार नाना पटोले यांनी पुढे बोलताना, गोसे प्रकल्पाचे काम १९१९ पर्यंत पूर्ण करून त्यास केंद्र शासनाकडून निधी मिळवून पुनर्वसन व शेतकऱ्यांचे जमिनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्राचा नवीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अवसरे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक विनोद भुरे यांनी केले. संचालन जयदेव गिरडकर यांनी केले. तर आभार धनराज जिभकाटे यांनी मानले. कसोटी नाटकाचे प्रकाशानंतर त्या नाटकाचे सादरीकरण परमपूज्य परमात्मा एक सेवक नाट्य मंडळ कोंढा तर्फे करण्यात आले. कार्यक्रमास नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील सेवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी दिपक जिभकाटे, चंदू कुर्झेकर, गंगाधर रेवतकर, विलास हटवार, वसंता कुर्झेकर, नामदेव मोहरकर, प्रकाश कुर्झेकर, कैलाश वंजारी, वासुदेव जिभकाटे, महेश जिभाकटे, बंडू जांभुळकर, राजू शिंगाडे, देवराम वैद्य, विनोद बिलवणे, यादोराव जांभुळकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)