शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:19 IST

दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे.

ठळक मुद्देपथनाट्याचा आधार : ईव्हीएम - व्हीव्हीपॅटचे तीनही मतदार संघात प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटद्वारे मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले जात असून पथनाट्यातून मतदानाचा संदेश दिला जात आहे. दिव्यांग, नवयुवक, नवयुवती व महिला मतदारांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरु आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शाळा महाविद्यालयात पथनाट्य, निबंध, रांगोळी स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा, साकोली, तुमसर या तीन विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायती उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.नरेश गीते यांनी या सर्वांना पत्र पाठवून आपल्या स्तरावर मतदार जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मिडीयावरून संदेश प्रसारित केले जात आहेत.दिव्यांगांसाठी विशेष सुविधादिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे. सीव्हीजील या आयोगाच्या अप्लीकेशनमध्ये तक्रार कशी करावी याची माहिती दिली जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.नरेश गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.मतदार नोंदणी मोहीम१ जानेवारी २०१९ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणाºया तरुण तरुणींच्या नावांची नोंदणी या जनजागृती मोहिमेंतर्गत केली जात आहे. तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी व नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा