भंडारा : शेतजमीन अधिक दाखवून नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम उचल करून शासनाची फसवणूक केली. यामध्ये चांदोरी येथील कोतवाल दोषी आढळले असताना सुद्धा कोतवालावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे. तालुक्यातील चांदोरी मालीपार येथील कोतवाल देवना फत्तू बन्सोड यांनी सन २००९-१० मध्ये झालेल्या नैसर्गीक आपत्तीमध्ये यांच्याकडे चांदोरी येथील असलेली गटक्रमांक ११५ क्रमांकाची १.६५ हेक्टर जमिनी आहे. बन्सोड यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी १.६५ हेक्टर ऐवजी २.६५ हेक्टर जमिन दाखवून शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम उचल केली. अनिलकुमार बन्सोड यांनी प्रशासनाला तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये देवनाथ बन्सोड यांनी पैशाची उचल करून दोषी आढळून आले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश उपविभागिय अधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना देण्यात आले आहे. मात्र अजुनपर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कारवाईची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)
कोतवालावर कारवाईस प्रशासनाची टाळाटाळ
By admin | Updated: June 4, 2016 00:22 IST