शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

आॅटो उलटला, १५ जखमी

By admin | Updated: April 24, 2015 00:25 IST

निलजहून वांगीकडे प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो उलटल्याने पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना वांगी येथे काल रात्रीच्या सुमारास घडली.

साकोली : निलजहून वांगीकडे प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो उलटल्याने पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना वांगी येथे काल रात्रीच्या सुमारास घडली. यातील पाच जखमींना साकोलीतील उपजिल्हा रूग्णालयात तर उर्वरीत जखमींना सडक अर्जुनी येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद साकोली पोलीस ठाण्यात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.चिंतामण बोरकर (६५) रा.बाम्हणी, पौर्णिमा शामकुवर (२७), तनुजा शामकुवर (४), शिशुकला शामकुवर (५५) तिन्ही रा.सुंदरी व वच्छला बन्सोड (३२) रा.सोनी अशी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची नावे आहेत. पोलिसांनी रुग्णालयाच्या मेमोवरून जखमींची अपघाताच्या रजिस्टवर नोंद केली असली तरी आॅटोचालकावर कुठलाही गुन्हा नोंदविला नाही. परिणामी आॅटोचा नंबर, आॅटोचालक कोण याचा पत्ता नाही. घटनेला जवळपास २० तास लोटले तरीही पोलीस गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)रेतीचा टिप्पर उलटला, दोन जखमीकरडी (पालोरा) : देव्हाडीहून नागपुरला रेती भरून जात असलेला टिप्पर उलटल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तुमसर तिरोडा राज्य मार्गावरील देव्हाडी खुर्द गावाजवळ घडली. यात योगेश पुरूषोत्तम तिवारी (३५) रा. नागपूर व जयकुमार सुरेश रा. विजयनगर हे जखमी झाले. दोघांनाही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टिप्पर क्रमांक एमएच ३१ बीएस २६८६ असून करडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास सहायक फौजदार अश्विनकुमार मेहर करीत आहे.ट्रकची एसटीला धडकएसटी चालक कारधा टी-पॉर्इंटहून भंडाराकडे वाहन आणत असताना ट्रकने एसटीला धडक दिली. ही घटना काल बुधवारी रात्री ७.४० च्या सुमारास घडली. यात सुदैवाने कुणालाही जीवितहानी झाली नाही. मात्र यात बसचे नुकसान झाले.