मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : बावनथडी नदीपात्रात देवनारा रेतीघाटात नियमानुसार रेती साठा उपलब्ध नसताना रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला. रेतीचा उपसा केल्याने नदीपात्रात माती दिसत असून खड्डे पडलेले आहेत. मध्यप्रदेशात जाण्याकरिता नदीपात्रातून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.तुमसर मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर देवनारा रेतीघाट आहे. बावनथडी नदीपात्रातील हा घाट रेतीसाठी प्रसिध्द आहे. मध्यप्रदेशाची सीमा येथून सुरु होते.नदीपात्रात महाराष्टÑ व मध्यप्रदेशाचे सीमांकन केले आहे. देवनारा रेतीघाटाचा लिलाव महसूल प्रशासनाने केला. सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदत आहे. नदीपात्रात रेतीसाठा नसून दगड व माती दिसत आहे. परंतु दररोज रेतीचा उपसा येथे सुरूच आहे.नियमानुसार लिलाव करताना नदीपात्रात रेती असणे गरजेचे असते. तीन मीटर रेती साठ्यापैकी एक मीटर रेतीचा उपसा करावा लागतो. दोन मीटर रेतीसाठा शिल्लक राहणे अनिवार्य आहे. येथे जमिनलागेपर्यंत रेतीचा उपसा करण्यात आला असून काळी माती दिसत आहे.रेतीघाटाचे सीमांकन कुठून कुठपर्यंत आहे. त्याची माहिती सर्वसामान्यांना नाही. घाट लिलावात मिळाल्याने जिथे रेतीसाठा आहे. तेथून उपसा सुरु आहे. नदीपात्रात रेतीसाठा नसताना रेतीघाट लिलाव का केले. असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुका मुख्यालयापासून दूर असलेला हा रेतीघाट टोकावर असल्याने सहसा इकडे कुणी फिरकत नाही.देवनारा रेतीघाटातील रेती उपसा प्रकरणासंदर्भात तुमसरचे तहसीलदारांना लक्ष देण्यासाठी सांगण्यात आले. नियमानुसारच रेतीचा उपसा झाला पाहिजे, नियमबाह्य उपसा करता येत नाही.- सुरेश नैताम, जिल्हाखनीकर्म अधिकारी भंडारा
नदीपात्रात रेती नसताना घाटाचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:27 IST
बावनथडी नदीपात्रात देवनारा रेतीघाटात नियमानुसार रेती साठा उपलब्ध नसताना रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला.
नदीपात्रात रेती नसताना घाटाचा लिलाव
ठळक मुद्देखड्डेच खड्डे : बावनथडी नदीपात्रातील तळाची दिसते माती