शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:16 IST

जवाहर नवोदय विद्यालयाच्या विविध विषयांना घेऊन समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने नवनिर्वाचीत खासदार सुनील मेंढे यांनी स्वत: पुढाकार घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाचगाव येथे शुक्रवारला बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

ठळक मुद्देपाचगाव येथे बैठक। खासदारांनी अधिकाऱ्यांना दिले समस्या सोडविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहर नवोदय विद्यालयाच्या विविध विषयांना घेऊन समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने नवनिर्वाचीत खासदार सुनील मेंढे यांनी स्वत: पुढाकार घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाचगाव येथे शुक्रवारला बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.पालकांच्या पूर्ण ८० विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याच्या भूमिकेला समजून घेत त्यांनी आधी ४० व नंतर ४० असा दोन टप्प्यात निकाल घोषित करण्याचे निर्देश नवोदय विद्यालय प्रशासनाला दिले. प्रशासनाने ही बाब मान्य केली. जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाने केवळ भंडारा जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणचे निकाल घोषात केल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.नवोदयच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी पाचगाव येथे निमार्णाधीन असलेल्या नवोदयच्या इमारत परिसरात बैठकीचे आयोजन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, सरपंचा सिमा रहांगडाले, जि.प. सदस्य रामराव कारेमोरे, प.स. सदस्य निशा कळंबे, महेश कळंबे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी टोणगावकर, तहसीलदार विजय देशमुख, केंद्रीय बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुप्ता, विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र राऊत तसेच गावकरी व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान प्राचार्य पालकांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर खासदार मेंढे यांनी विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याच दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. खासदारांनी निर्देश दिल्यानुसार कंत्राटदाराने मुलांचे वस्तीगृह आणि वर्गखोल्या ३१ आॅगस्टपर्यंत तयार करून देण्याचे आश्वासन दिले आहे. जुन्या व नवीन ४० विद्यार्थ्यांची राहण्याची व इतर सुविधांची व्यवस्था यामुळे होणार असून ४० विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ घोषित करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. उर्वरीत ४० विद्यार्थ्यांचा निकाल निवासाची व्यवस्था झाल्यानंतर घोषित करून त्यांनाही याच सत्रात प्रवेश देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी नवोदय प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले. उपलब्ध असलेला शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्याना बसण्याची व्यवस्था आदी विषयांचा आढावा खासदारांनी घेतला. काही ठिकाणी बांधकामाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचनाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Educationशिक्षण