शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

रोहा घाटावर तलाठी व कोतवालावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

महसूल विभागाने रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. विविध ठिकाणी तपासणी चौकी लावण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावरही बैठे पथकाची चौकी लावण्यात आली. बुधवारी मोहाडी तहसील कार्यालयातील तलाठी पराग जयकांत तितीरमारे, अमोल शरद पोरेड्डीवार, कोतवाल हेमंतकुमार हरिशचंद्र गराडे, उमाशंकर फकीरा पडोळे आणि होमगार्ड खुशाल झेलकर कर्तव्यावर होते

ठळक मुद्देमहसूलच्या बैठ्या पथकातील कर्मचारी : आठ जणांवर गुन्हा दाखल, टिप्परमुळे वीज तारा तुटल्याने गावकरी झाले संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी/आंधळगाव : रेती तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठी व कोतवालावर हल्ला करुन बेदम मारहाण करण्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा येथे घडली. रेती टिप्परच्या हायड्रोलिक ट्रॉलीने तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी रोहा येथील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रेती तस्करांविरुध्द मात्र कोणतीही कारवाई आली नाही. तुमसरच्या तहसीलदारांवरील हल्ल्याची शाही वाळत नाही तोच मोहाडी तालुक्यात घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.महसूल विभागाने रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. विविध ठिकाणी तपासणी चौकी लावण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावरही बैठे पथकाची चौकी लावण्यात आली. बुधवारी मोहाडी तहसील कार्यालयातील तलाठी पराग जयकांत तितीरमारे, अमोल शरद पोरेड्डीवार, कोतवाल हेमंतकुमार हरिशचंद्र गराडे, उमाशंकर फकीरा पडोळे आणि होमगार्ड खुशाल झेलकर कर्तव्यावर होते. सायंकाळच्या सुमारास बेटाळा कडून रेती भरुन आलेल्या दोन टिप्परची चौकशी केले. त्यावेळी रेती वाहतूकीची रॉयल्टी नसल्याचे लक्षात आले. दोन्ही टिप्पर चालकांना टिप्पर मोहाडी तहसील कार्यालयात घेऊन जाण्याची बैठा तलाठ्याने दिली. या पथकातील दोघांना टिप्परमध्ये बसविण्यात आले. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या युवकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना टिप्पर का अडविला असे म्हणत चालकांना रेती खाली करण्यास सांगितले. त्यावरुन चालकांनी हायड्रॉलीक ट्रॉली उचलून रेती खाली करीत असतांना टिप्पर पळविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या ट्रॉलीमुळे रोहा गावाला वीज पुरवठा करणाºया तारा तुटून मोठा आवाज झाला. गावातील लोक धाव या बैठा चौकीकडे आले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लाठ्या आणि लाथाबुक्यानी कोतवालांना मारहाण केली. या सर्व गोंधळात टिप्पर चालक मात्र तेथून वाहनासह पसार झाले. दरम्यान तलाठी पराग तितीरमारे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन आरोपी प्र्रकाश पडोळे, आकाश पडोळे, हेमराज पडोळे, धनराज पडोळे, गौरीशंकर पवारे, उमाशंकर पवारे, वासुदवे पडोळे, अंकुश अहिर यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहीस्तोवर कुणालाही अटक करण्यात आली नाही.कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारामोहाडी तालुक्यातील रोहा येथे झालेल्या हल्ला प्रकरणाचा धस्का महसूल पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी घेतला आहे. मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांना निवेदन देवून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही. तोपर्यंत तालुक्यातील रेतीघाटांवर बैठे पथक कर्तव्य बजावणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन विदर्भ पटवारी संघाची तुमसर उपशाखा आणि मोहाडी तालुका कोतवाल संयुक्त संघर्षसमितीने दिले आहे. या पथकावरील हल्ल्याचा विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने निषेधही करण्यात आला आहे.