शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यावर हल्ला; तरुणीच्या दोन भावांसह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 16:21 IST

आकोट येथील घटना, हल्ल्यात तरुणाचे वडीलही जखमी

भंडारा : प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यासह वडिलांवर जीवघेणा हल्ला तरुणीच्या माहेरच्यांनी करण्याची घटना पवनी तालुक्यातील आकोट येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. लाठीकाठीने मारहाण केल्याने तिघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी भंडाराच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तरुणीच्या दोन भाऊ, काकांसह पाच जणांविरूद्ध अड्याळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पती फिरोज धनराज तेलमासरे (२५), पत्नी पूजा फिरोज तेलमासरे (२०), वडील धनराज तेलमासरे (रा. आकोट, ता. पवनी) अशी जखमींची नावे आहेत. फिरोजचा हॉटेलचा व्यवसाय असून दोघेही आकोट येथेच आईवडिलांसह राहतात. पूजाच्या आई-वडिलांचा या विवाहाला सुरुवातीपासून विरोध असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते.

सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पूजाच्या हाताला बांगडी रुतली. त्यामुळे फिरोज तिला कोंढा येथे रुग्णालयात घेऊन जात होता. त्याचवेळी फिरोजला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली, आकोटला ये पाहून घेतो, अशी धमकी दिली. पत्नीवर उपचार करून तिला घरी सोडले आणि फिरोज हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाला. त्यावेळी रस्त्यात भोजराज तुळसकर (४०), अंकित तुळसकर (२४), हितेश तुळसकर (३०), योगेश तुळसकर (२७), प्रदीप तुळसकर (४०) आणि एका अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करून फिरोजला काठीने मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून वडील धनराज तेलमासरे तेथे आले. त्यांनाही मारहाण केली.

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी पूजालाही बेदम मारहाण करण्यात आली. तसेच फिरोजच्या काका-काकूलाही मारहाण केली. यात पत्नी-पत्नीसह वडील गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची तक्रार मध्यरात्री अड्याळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. त्यावरून पूजाच्या माहेरच्या पाच जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र इंगोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हेमराज सोरते करीत आहेत.

तिघांचीही प्रकृती गंभीर

मारहाणीत फिरोज, पूजा आणि वडील धनराज गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरू आहेत. प्रेम प्रकरणातून झालेल्या या जीवघेण्यात हल्ल्याने पवनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

महिनाभरापूर्वी प्रेमविवाह

आकोट येथील फिरोज तेलमासरे या तरुणाचे गावातीलच पूजा तुळसकर या महाविद्यालयीन तरुणीवर प्रेम होते. मात्र दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिरात १७ जून रोजी विवाह केला. त्यानंतर कोंढा येथील पंकज मंगल कार्यालयात स्वागत समारंभही आयोजित केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा