शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तहसील प्रशासनाकडून १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वधर्मीयांची धाव : सोशल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्था कक्षातर्फे गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात आले.१० एप्रिलपर्यंत १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. राशन कार्ड नसलेले, निराधार, अपंग, गरीब व गरजू लोक उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. तालुक्यातील राईस मिल असोशिएशन तर्फे प्रत्येक व्यक्तीला १० किलो तांदूळ, परमपूज्य सिंधी पंचायत गुरुद्वारा लाखनी तर्फे आटा, तूरडाळ, तेल, साखर, बिस्कीटे, कच्ची मेमन समाज मुस्लिम मंडळ लाखनी द्वारे मीठ, मिरची, हळद, मसाला, उदबत्ती, साबून, चहापत्ती आदी जिन्नस देण्यात आले. तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून मोमबत्ती, अगरबत्ती, कंगवा, पेस्ट, कापड, बर्तन आदी साहित्य देण्यात आले. स्थानिक शेल्टर होम व गरजू लोकांना जेवण, चहा, नाश्ता सिंधी समाजातर्फे पुरविण्यात येत आहे. तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या नेतृत्वात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक नरेश नवखरे यांचे सहकार्याने तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती लाखनी नगरपंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच लाखनीतील उदार मनाने सहकार्य व मदत करणाºया लोकांमुळे तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत घेऊन तालुका प्रशासनाला पोहचता येत आहे.लाखनीतील सर्वधर्मसमभावाचे ब्रिद जोपासणाऱ्या  उदार, दातृत्व व्यक्तीमुळे प्रत्येकाला मदत करता आली आहे. एकीचे बळ जगण्याचे सामर्थ्य निर्माण करून देत आहे. कोरोनामुक्तीचा संघर्ष सुरु असताना मदतीचा हात पुढे करणाºया संस्था व व्यक्तींना बघून तेथे कर माझे जुळती असे म्हणावे वाटते.-मल्लीक विराणी, तहसीलदार, लाखनी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या