शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आंधळगाव ते धुसाळा रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्यामुळे  रस्त्यावरील गिट्टी बाहेर निघाली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कमालीची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डागडुजीचे काम  करण्यात आले. परंतु रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित न केल्यामुळे गिट्टी व मुरूम बाहेर निघाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. बांधकाम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सेलोकर, देवा  पुडके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशील बोपचे, प्रवीण सेलोकर, गुरुदेव सेलोकर, अक्षय बोंद्रे, स्वप्नील सेलोकर, शामदादा कोसरे, भावेश निमकर, स्वप्नील वणवे, अंकित सेलोकर तसेच नवेगाव व धुसाळा येथील नागरिकांनी दिला आहे.

आमचा जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय?- माेहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव हा रस्ता रहदारीचा आहे. मात्र तरीही याकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यावर दुचाकी घसरुन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याने आमचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय? असा संतप्त सवाल धुसाळा, आंधळगावसह परिसरातील नागरिकांनी केला आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग