शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अस्मितादर्श चळवळीने आंबेडकरी विचार रुजविले

By admin | Updated: July 2, 2015 00:46 IST

अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन मराठी साहित्य ..

गं्रथसंवाद कार्यक्रम : हर्षल मेश्राम यांचे प्रतिपादनभंडारा : अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळीला वैचारिक अधिष्ठान देऊन मराठी साहित्य संस्कृतीचा प्रवाह अधिक विस्तृत व सखोल केला. त्यांचा विद्याव्यासंग आणि विचार साधना परिवर्तनशील चळवळीला नेहमीच प्रेरणादायी राहिली, असे प्रतिपादन साहित्यिक हर्षल मेश्राम यांनी केले.सार्वजनिक वाचनालय व विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्रंथसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.सुधीर गुप्ते होते. यावेळी मेश्राम म्हणाले, त्यांनी अनेक अपरिचित व अप्रकाशित लेखक, साहित्यीक व कवींना लिहिण्याचे बळ दिले. जागतिक स्तरावर त्यांच्या वैचारिक लेखनाची चर्चा केली जाते. डॉ.पानतावणे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटनांचा संदर्भ दिला. यावेळी ‘पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ग्रंथसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते डॉ.अनिल नितनवरे होते. ग्रंथाविषयी बोलताना डॉ.नितनवरे म्हणाले, हा ग्रंथ म्हणजे अनेक गं्रथाचा मुळाधार व ग्रंथाचा बाप आहे. हा शोधग्रंथ म्हणजे वृत्तपत्रीय विश्वातील सतत प्रेरणा देणारे स्त्रोत आहे. यातूनच डॉ.यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, डॉ.कुंभारे, डॉ.खरात, डॉ.कांबळे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा आपल्या ग्रंथातून शोध घेतला. परंतु या सर्वांचे मुळबीज डॉ.गंगाधर पानतावणे यांनी लिहिलेल्या पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या शोध ग्रंथात सापडतात. त्यांच्या लिखाणात आक्राळस्तेपणा नाही. सयंत व सापेक्षी समीक्षक आहेत. अ‍ॅड. गुप्ते म्हणाले, डॉ.पानतावणे निर्मेही व निरागस माया करणारे वात्सल्यवृक्ष आहेत. मागील चार वर्षापासून त्यांच्याच ग्रंथावर गं्रंथसंवाद हा कार्यक्रम घेत असतो. यावेळी डॉ.जयंत आठवले, डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे, जी.बी. चरडे, विनोद मेश्राम, विनोद आकरे, नीळकंठ साखरवाडे, निळकंठ रणदिवे, मा.ह. रामटेके, विनय श्रृंगारपवार, गुणवंत काळबांडे, पत्रकार जयकृष्ण बावणकुळे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रदीप गादेवार यांनी केले. कार्यक्रमाकरिता घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, सुधीर खोब्रागडे, दिनेश हरडे, युवराज साठवणे व सुभाष साकुरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)