शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत युरिया खताची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

मोहाडी तालुक्यात अनेक खेतकरी रबी हंगामात गव्हाचे पीक घेतात. सध्या गव्हाच्या लागवडीला वेग आला आहे. शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे.

ठळक मुद्देचढ्या दराने विक्री : कृषी केंद्रावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांचंी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रबी हंगामासाठी शेतकरी विविध रासायनिक खतांची खरेदी करीत असताना गत काही दिवसांपासून तालुक्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही विक्रेते चढ्या दराने खताची विक्री करीत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.मोहाडी तालुक्यात अनेक खेतकरी रबी हंगामात गव्हाचे पीक घेतात. सध्या गव्हाच्या लागवडीला वेग आला आहे. शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव चढ्या दरात युरिया खरेदी करावा लागतो.विशेष म्हणजे प्रत्येक हंगामातच काही कृषी विक्रेते युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यातून शेतकºयांची मोठी आर्थिक लुट होत आहे.या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू शेख, पुरूषोत्तम पात्रे यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. कृषी विभागाने याप्रकरणी दखल घेऊन काळा बाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.विक्रेते करतात लिंकिंगयुरिया विकत घेताना काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना इतर खते किंवा किटकनाशक विकत घेण्याची शक्ती करतात. इतर खते अथवा किटकनाशक खरेदी केले तरच युरिया देतात. शेतकऱ्यांना केवळ युरियाची गरज असते. मात्र नाईलाजाने शेतकऱ्यांना युरियासोबत इतर उत्पादन विकत घ्यावे लागते. कृषी केंद्र चालकांच्या या लिंकींगवर कुणाचाही अंकुश नाही.तालुक्यात युरियाचा कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याची अथवा अधिक दराने विक्री होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. कोणत्याही शेतकऱ्यांने अधिक किंमत देऊन युरिया खरेदी करू नये.-रविंद्र वंजारी, कृषी विस्तार अधिकारी, मोहाडी.

टॅग्स :agricultureशेती