शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:35 IST

भविष्यकाळ हे भयंकर आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये कलेचा गुण पेरा. यात शाहिरी असो वा झाडीबोलीतील दंडार, खडी गंमत, भारुड असे नाविन्य वर्तमान काळातील परिवर्तनातील घडामोडींचे अंतर्भाव असावा.

ठळक मुद्देशाहिर दादा पासलकर : झाडीबोली साहित्य संमेलनाचे वाजले सुप

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भविष्यकाळ हे भयंकर आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये कलेचा गुण पेरा. यात शाहिरी असो वा झाडीबोलीतील दंडार, खडी गंमत, भारुड असे नाविन्य वर्तमान काळातील परिवर्तनातील घडामोडींचे अंतर्भाव असावा. कलेल्या सानिध्यात राहल्याने मानवाला नवजीवन, नवसंजीवनी मिळते. परिणामी कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे उत्तम साहित्य आहे. असे प्रतिपादन महाराष्टÑ शाहिर परिषद पुणेचे अध्यक्ष शाहिर दादा पासलकर यांनी केले.तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था महात्मा गांधी अभ्यास केंद्र व झाडीबोली साहित्य मंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. घनश्याम डोंगरे, साहित्य नगरी, पेट्रोलपंप जवाहरनगर येथे समारोपीय मुख्य अतिथी म्हणून शाहिर दादा पासलकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर हे होते. यावेळी ज्येष्ठ लोककलावंत व साहित्यीक विजय जगताप, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभरे (गडचिरोली) झाडीबोली साहित्य मंडळ शाखा साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष महेश टेंभरे, हिरामन लंजे, मधुकर नंदनवार, राम महाजन उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. मधुकर नंदनवार लिखीत भंडारा जिल्ह्यातील लोकनाट्य दंडार या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यापिठ उन्हाळी २०१७ परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना परितोषीक देण्यात आले. यात नेहा सेलोकर (बीए), अर्चना ढोबळे (बीकॉम), जयंत पडोळे (बीबीए), किर्ती राहुल (एमए) सीता बाग, योगिता खोब्रागडे, पुजा गेडाम, राखी पाल, सुषमा रुद्रकार, अक्षय बागडे यांचा समावेश आहे.तत्पूर्वी सकाळी ‘माझी पहिली पुस्तक’ या विषयावर डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. यात सहभागी वासुदेव रार्घोते (नागपूर) चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली), इंद्रकला बोपचे (आमगाव), विजय मेश्राम (गोंदिया) यांचा समावेश होता.संचालन डॉ. अनिता वंजारी यांनी तर आभार गजानन कोर्तलाकर यांनी केले. तद्नंतर दंडारमहर्षी रघुनाथ बोरकर यांच्या चळवळीने मला काय दिले, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कवयित्री अंजणाबाई खुणे या होत्या. अंजनाबाई खुणे यांनी सादर केलेली कविता ही हिरामण लंजे या भावाला आवतन म्हणून अर्पण केली, असे सांगितले.र.स. गि-हेपुंजे मांडो अंतर्गत असी माझी शाखा या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी लखनसिंह कटरे हे होते. संचालन डॉ. रामलाल चौधरी आभार राजेंद्र घोटकर यांनी केले.