शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

थकीत विद्युत बिल व दुरुस्तीअभावी दोन वर्षांपासून आरो प्लांट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

कोट... आरो प्लांटचे पंधरा महिन्यांचे थकीत विद्युत बिल ५५ हजार रुपयांच्या घरात आहे. तर आरो प्लांट मशीन तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त ...

कोट...

आरो प्लांटचे पंधरा महिन्यांचे थकीत विद्युत बिल ५५ हजार रुपयांच्या घरात आहे. तर आरो प्लांट मशीन तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी एक लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहेत. सद्यस्थितीत ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. तर सामान्य फंडात पर्याप्त निधी उपलब्ध नाही. त्यामुळे दुरुस्तीस अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी आरो प्लांट बंद अवस्थेत आहे.

- भाऊराव लाळे, उपसरपंच, ग्रा.पं. देव्हाडा (बुज)करडी (पालोरा)

देव्हाडा बुज येथे दोन वर्षांपूर्वी गावातील प्रत्येक नागरिकाला शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने ग्रामपंचायत सामान्य फंडातून तीन लक्ष रुपये खर्चून बाजार चौकात हजारो लीटर क्षमतेच्या शुध्द पाण्याचा आरो प्लांट उभारण्यात आला. परंतु आज थकीत बिल व तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला असून धूळखात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भरउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मोहाडी तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच्या देव्हाडा (बुज) येथे सन २०१८-२०१९ या वर्षात तीन लक्ष रुपये सामान्य निधीतून खर्च करून गावातील गरजू नागरिकांसाठी ‘दहा रुपयांत वीस लीटर पाणी’ या धोरणावर शुध्द पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट उभारला होता. परंतु सदर आरो प्लांट तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, सचिव, उपसरपंच व सदस्याच्या दुर्लक्षितपणामुळे, तर विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या काळात ग्रामपंचायतीत पैशाचा ठणठणाट असल्याने देखभाल, दुरुस्तीअभावी दोन वर्षांपासून बंद पडला आहे. देव्हाडा बुज हद्दीत साखर कारखाना व तुमसर-गोंदिया-साकोली मार्गावर गुरांचा बाजार प्रसिध्द आहे. याच परिसरामध्ये व्यापारी संकुलच्या इमारतीत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट तीन लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात आला. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. नवीन पदाधिकारी विराजमान झाले. त्यांनी दोन बंद पडलेल्या आरो प्लांटचा काही प्रमाणात वीजबिल भरणा करून वीजपुरवठा सुरू केला होता. परंतु परत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्याला एक लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. आरो प्लांटला पूर्ववत सुरू करण्यासंबंधी विद्यमान पदाधिकारी अनुकूल आहेत. मात्र ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने आरो प्लांट जैसे थे स्थितीतच ठेवला गेला. त्यामुळे आरो प्लांटवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात बुडाला असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे व विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे शुध्द पिण्याच्या पाण्यापासून नागरिकाना वंचित राहावे लागत आहे.

कोट...

आरो प्लांटचे पंधरा महिन्यांचे थकीत विद्युत बिल ५५ हजार रुपयांच्या घरात आहे. तर आरो प्लांट मशीन तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी एक लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहेत. सद्यस्थितीत ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. तर सामान्य फंडात पर्याप्त निधी उपलब्ध नाही. त्यामुळे दुरुस्तीस अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी आरो प्लांट बंद अवस्थेत आहे.

- भाऊराव लाळे, उपसरपंच, ग्रा.पं. देव्हाडा (बुज)