शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात येताय, आरोग्य सांभाळा

By admin | Updated: July 17, 2017 00:24 IST

शहराच्या हृदयस्थळी (मोठा बाजार परिसर) आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत.

स्वच्छतेचे धिंडवडे : लक्षावधींचा महसूल देणाऱ्या बाजाराची दूरवस्थालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या हृदयस्थळी (मोठा बाजार परिसर) आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीव्यवसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला भाजीपाला, ओट्यांची दुरवस्था, अतिक्रमण हीच खरी ओळख या बाजाराची बनली आहे. प्रशासन मात्र प्रस्तावाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रीत करून आहे. जिल्ह्याचीे लोकसंख्या १५ लाखांच्या वर पोहोचली आहे. यात भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्यातून दोन वेळा आठवडी बाजार भरतो. रविवारी मोठा तर बुधवारी मिनी बाजार भरतो. रविवारपेक्षा बुधवारी भाजी विक्रेत्यांची संख्या कमी असते. या बाजारारत टाकळी, पांढराबोडी, गणेशपूर, कारधा, भिलेवाडा, पलाडी, करचखेडा, सुरेवाडा, माडगी, सातोना, मोहदुरा, खोकरला, टेकपार, भोजापूर आदी गावातील लहान-मोठे भाजीविक्रेते येत असतात. लोकसंख्येच्या मानाने शहराच्या विविध ठिकाणीही बाजार भरतो. यात महात्मा गांधी चौक, बीटीबी मार्केट (थोक सब्जी मंडी बाजार), मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक मार्ग, खात रोड मार्ग आदी ठिकाणचा समावेश आहे. परंतु मोठा बाजार परिसरात रविवारी व बुधवारी भरणाऱ्या बाजाराची शान आजही कमी झालेली नाही. मात्र सुविधांअभावी या बाजाराला अजुनही उठाव आलेला नाही. हजारो नागरिक येथे बाजारासाठी येत असले तरी विकासाअभावी त्यांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला सर्वस्वी जबाबदार नगर पालिक प्रशासन आहे, असेही म्हणता येणार नाही. याला नागरिकांसह भाजीविक्रेत्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. या आहेत प्रमुख समस्याआठवडी बाजार ओसरल्यानंतर सडलेला भाजीपाला आणि साहित्य तिथेच फेकून दिले जाते. कर देतोय तर सुविधा का मिळत नाही? असा थेट सवाल या भाजीविक्रेत्यांचा आहे. दुसरीकडे एका भाजीविक्रेत्याकडून बाजाराच्या दिवशी एका भाजीविक्रेत्याकडून पावती फाडली जाते. आठवडी बाजाराचा कंत्राट कुणालाही असो मात्र लिलावातून मिळणारी रक्कम थेथ पालिका प्रशासनालाच मिळते. सडक्या भाजीपाल्यांवर यथेच्छ ताव मारणारे मोकाट जनावरे, अतिक्रमण निर्मूलनानंतर वाईट स्थितीत आलेले बाजारओटे, २४ तास येणारी दुर्गंधी, पाण्याची टंचाई, नाल्यांचे सदोष बांधकाम, साचलेला कचरा या बाजाराच्या प्रमुख समस्या आहेत.