शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात अवकाळी पावसाचे गारांसह आगमन; कापणीच्या धानाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:53 IST

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देवर्धा, भंडारा व नागपुरात पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.शेत शिवारात असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना एकच धावपळ करीत घर गाठावे लागले. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे . भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका नक्कीच सहन करावा लागणार आहे .कापणीला आलेले धान जमीनदोस्त होण्याची भीती वाटत आहे.वर्धा जिल्ह्यात हमदापूर आणि शिवारात सोमवारला अकस्मात वादळासह पाऊस आणि गारपीट झाल्याने हमदापूर आणि रज्जकपूर येथे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.सकाळपासून ऊन तापत असताना दुपारी २.१५ ते २.४५ च्या सुमारास जोरदार हवा सुरू होऊन जोराचा गारासह पाऊस सुरू झाला. यात राजनगीरी महाराज मंदिराची भित पडली. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील मोठे झाड पडल्याने वीज तारा तुटल्या. युवराज नगराळे यांच्या शेतातील सौरऊजार्चे पँनल कोसळले.तसचे रज्जकपूर पारधी बेड्यावरील दिनेश पवार,गुड्डू भोसले, विशाल पवार यांच्या घरावरील टिना उडाल्या. यात जीवित हानी झाली नाही अशी माहिती पोलीस पाटील अतुल कांबळे यांनी दिली.कोरोनाच्या संकटाने सर्वच हवालदिल झाले असताना यात भर पडली ती नैसर्गिक संकटाची. शासनाने गाव खेड्यातील समस्येकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस