लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जवळपास १२ दिवसांपुर्वी टोळधाड कीडिने जिल्ह्यात प्रवेश करून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली होती. त्यावर कृषी विभागाने मात करीत या कीडीला पछाडून सोडले होते. मात्र गुरूवारी पुन्हा या टोळधाड कीडीचे तुमसर तालुक्यात मध्यप्रदेशातून आगमन झाले आहे.१२ दिवसांपुर्वी आलेल्या टोळधाडीने तालुक्यातील शेतकरी हादरून गेला होता. दरम्यान गुरूवारी पुन्हा तुमसर शहरात टोळधाड ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून आली. आधीच कोरोना विषाणूचा संकट कायम असताना या अतिशय नुकसान करणाऱ्या कीडींच्या हल्ल्याने सर्वांचे टेंशन वाढले आहेत.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या कीडीने मोठे नुकसान केले आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मध्यप्रदेशातून या कीडीचे आगमन झाले आहे. तालुका कृषी विभागाच्यावतीने या कीडीला तालुक्यातूनच हद्दपार करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने या कीडीचे प्रमाण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टोळधाड कीडीचे काही थवे हसारा, हिंगणा या गावपरिसरात दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिकांचे नुकसान होवू नये म्हणून कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही ठिकाणी या कीडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले तरी उपाययोजना कागदावरच असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
तुमसरात टोळधाडीचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST
१२ दिवसांपुर्वी आलेल्या टोळधाडीने तालुक्यातील शेतकरी हादरून गेला होता. दरम्यान गुरूवारी पुन्हा तुमसर शहरात टोळधाड ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून आली. आधीच कोरोना विषाणूचा संकट कायम असताना या अतिशय नुकसान करणाऱ्या कीडींच्या हल्ल्याने सर्वांचे टेंशन वाढले आहेत.
तुमसरात टोळधाडीचे आगमन
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये भीती : मध्यप्रदेशातून आगमन