शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वैमनस्यातून सशस्त्र हल्ला

By admin | Updated: November 20, 2015 01:22 IST

जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन युवकांनी एका दुकानावर सशस्त्र हल्ला केला. हल्ला करणारे व फिर्यादी यांच्यात झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले.

वरठी येथील घटना : हल्ल्यात चार जखमी, तपास सुरूवरठी : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन युवकांनी एका दुकानावर सशस्त्र हल्ला केला. हल्ला करणारे व फिर्यादी यांच्यात झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ.आंबेडकर चौकात अरूण वासनिक यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. सकाळपासून ते दुकानात होते. आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे अरुण वासनिक यांचे प्रदीप व संदीप ही दोन मुले दुकानात होते. दुपारच्या वेळी वरठी येथील साजन देशभ्रतार व पाचगाव येथील राजेश शहारे हे दुकानात येऊन सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांचा बचाव करताना त्यांच्यात हाणामारी झाली. यात दुकानदार अरुण वासनिक, प्रदीप वासनिक व साजन देशभ्रतार आणि राजेश शहारे हे जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटात अनेक दिवसांपासून वाद होता. दोन वर्षापुर्वी राजेश शहारे यांच्यासोबत पाचगाव येथे भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी आज हा हल्ला केल्याचे समजते. मागीलवर्षी साजन देशभ्रतार यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. त्यातून तो बचावला. आजच्या घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु जुन्या वैमनस्यातून हे भांडण झाले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती शेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने करीत आहेत. (वार्ताहर)