शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी शासकीय पाहुणचार घेत आहेत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:19 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनाना पटोलेंचा सवाल : २५ दिवसांपासून सात आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ दिवस होऊनही हे आरोपी सापडू शकले नाहीत ते शासकीय पाहुणचार घेत आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.२५ दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील रोहा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना काही रेती तसकरांनी पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. आता पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पोलिसांनाच सापडत नसतील तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? असा सवालही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भंडारा या शांत जिल्ह्यात कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओढवली आहे. या प्रकाराला राज्य सरकारचे गृहखातेच जबाबदार असून खतपाणी घालत आहे.एखाद्या घटनेचा गांभीर्याने शोध घेणाऱ्या भंडारा पोलिसांना हल्ला करणारे आरोपी कसे सापडू शकत नाही, हे आश्चर्यकारक म्हणावे असे आहे. या आरोपीमध्ये भाजपच्या पदाधिकाºयाचा समावेश आहे. एकीकडे गुंडांना पाठीशी घालत नाहीत, असे सांगणारे मुख्यमंत्री गुंड प्रवृत्तीच्या आरोपीना पाठिशी कसे घालत आहेत, असा प्रश्न करून भाजपात गुंडांना अभय असल्याचा आरोप केला आहे. मागील २५ दिवसापासून गंभीर गुन्ह्याचे हे आरोपी सापडत नसतील तर या घटनेला आणि आरोपींना गृहविभागच आश्रयदाते ठरत आहेत, असा गंभीर आरोपही नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.चप्राड मंदिरातील दानपेटी चोरटे मोकाटचलाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीवर असलेल्या देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी घातलेले दान चोरट्यांनी नेले. परंतु पोलिसांना या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाही, चोरी, हल्ले असे प्रकार घडत असतानाही पोलिसाना आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग पावली आहे.