शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

जिल्ह्यात सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे हा या मागचा उद्देश असून जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे. 

ठळक मुद्देजल जीवन मिशन : आठ योजना सौरऊर्जेवर चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना व प्रत्येक घरी नळ या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. यातील आठ योजना सौरऊर्जेवर चालणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपवनसंरक्षक एस. एस. भलावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघमित्रा कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजय देशमुख, वरिष्ठ भु वैज्ञानिक शिवाजी पदमने, उपअभियंता यांत्रिकी नितीन पाटील, उपअभियंता दिनेश देवगडे, सहायक भु वैज्ञानिक व्ही. एम. मंत्री, जीवन प्राधिकारणाचे उपअभियंता डी. यू. तुरकर उपस्थित होते.जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावे हा या मागचा उद्देश असून जिल्ह्यात प्रत्येक घरी नळ जोडणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या गावात होणार योजना - भंडारा तालुक्यातील सालेहेटी २४ लाख ९८ हजार, सीतेपर २३ लाख ९८ हजार, लाखनी तालुक्यातील गोंदी २४ लाख २१ हजार, सानगाव १५ लाख ६५ हजार, सायगाव १६ लाख ८३ हजार, पवनी तालुक्यातील चन्नेवाडा २७ लाख ३० हजार, खैरी २६ लाख ८८ हजार, सुरेबोडी २० लाख ८९ हजार, कुर्झा २४  लाख ९८, लाखांदूर तालुक्यातील आसोला ६६ लाख ९ हजार, विरली बु. ६१लाख ७० हजार, मोहाडी तालुक्यातील खडकी ८७ लाख ६६ हजार, पांजरा बोथली ४१ लाख ७६ हजार, विहिरगाव ४६ लाख १२  हजार व तुमसर तालुक्यातील मेहेगाव ६० लाख ५५ हजार आणि पांजरा योजना ३० लाख ४७ हजार किमतीच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.७६३ गावांत प्रत्येक घरी नळ जोडणी - जिल्ह्यातील ७६३  गावात प्रत्येक घारी नळ जोडणी प्रस्तावित असून ३०२ गावात योजनेची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ५२ टक्के घरी नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित नळ तातडीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Waterपाणी