शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे तरुणांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:18 IST

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद : मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली आहे. १ जानेवारी २०१९ ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण होतात अशा सर्व व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत केले.उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यात सध्या ९ लाख ६० हजार ४४७ मतदार आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २ हजार २०० मृत मतदारांची नावे यादीतून कमी केली असून १० हजार नवीन नावांची नोंदणी झाली आहे.मतदानस्तरीय केंद्र अधिकाºयांनी घरोघरी जावून हे कार्य केले आहे. जिल्ह्यात ९ लाख ३२ हजार ६३४ मतदार हे छायाचित्र ओळखपत्र असलेले मतदार असून २७ हजार १६८ मतदारांकडे फोटो छायाचित्र ओळखपत्र नाही. अशा मतदारांना यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मतदार यादी दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून राजकीय पक्षांनी केंद्रस्तरीय एजंट नेमून जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.२०१९ ची निवडणूक दिव्यांग सुलभ निवडणूक म्हणून आयोगाने घोषित केली असून या नुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बनविले आहेत. सोबतच दिव्यांग व्यक्तीच्या सहकार्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येणाºया निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. या बाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रत्येक बुथस्तरावर व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.प्रारुप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर हा असणार आहे. दोन महिन्याचा हा कालावधी अतिशय महत्वाचा असून या काळात नव्याने मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण झाली अशा महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी महाविद्यालयात विशेष नोंदणी अभियान घेण्यात येणार आहे.अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया निरंतर असली तरी २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूका प्रस्तावित असल्यामुळे अद्यावत मतदार यादीसाठी जास्तीत जास्त नोंदणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होताच आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास मतदान केंद्र अधिकाºयाकडे अर्ज करुन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.