शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ विक्रेत्यांना आवाहन; १०० रुपयांत परवाना काढून निश्चिंत व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:24 IST

Bhandara : अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना नोंदणी घेण्याकरिता विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या किरकोळ विक्रेत्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्या व्यावसायिकांनी परवाना घेणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ अंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, अन्यथा पाच लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो.

ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. जे अन्न व्यावसायिक विनापरवाना, विनानोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतूद आहे, जे दुकानदार खराब पदार्थ ग्राहकांना देतात, त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्राहकांनीही घ्यावी काळजी• प्रत्येक खाद्यपदार्थांसमोर बेस्ट बिफोर लिहिले आहे किंवा नाही याची चौकशी ग्राहकांनी स्वतः करून घ्यायची आहे.• बेस्ट बिफोर लिहिले नसेल तर यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला तक्रार करता येईल. विकत घेत असलेले खाद्यपदार्थ ताजे आहे किंवा नाही, त्यात भेसळ असल्याचा संशय आल्यास तक्रार करावी.

दर्शनी भागात लावावे प्रमाणपत्र• अन्न परवाना प्रमाणपत्र दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात लावावे. जेणेकरून ते दुकान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारित असून, त्याची नोंदणी झाली आहे हे ग्राहकांना कळेल.

नोंदणीसाठी करा अर्जभंडारा जिल्ह्यातील अनेक किरकोळ व्यावसायिकांनी एफएसएसएएआयसाठी नोंदणी केली आहे. परंतु, ज्यांनी केली नाही, अशांना परवाना घेताना एफएसएसएएआय डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या व्यावसायिकांना नोंदणी आवश्यकअन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना नोंदणी घेण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, भाजीपाला, फळेविक्रेते, पावभाजी, पाणीपुरी विक्रेते, अंडे, मांस, मटन, विक्रेते, मासे विक्रेते तसेच उत्पादक यांनी त्वरित अन्न परवाना नोंदणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा