शेतकरीवर्गांना खते खरेदी करताना अडचण जाऊ नये. शासनाने पुरवून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून खतांची विक्री करण्याकरिता निविष्ठाधारक व शेतकऱ्यांना सोयीचे होईल. तालुक्यात काही ठिकाणी खत असूनही निविष्ठाधारक शेतकऱ्यांना युरिया खत पुरवित नसल्याच्या तक्रारी मिळालेले आहेत. अशाप्रसंगी कृषी निविष्ठाधारकांना स्पष्ट सूचना आहेत. उपलब्ध असलेल्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना निर्धारित दरात पुरवा. शेतकरीबांधवांनी सुद्धा स्वतःचा आधार नंबरसोबत घेत कृषी निविष्ठा धारकांना पाॅस मशीनद्वारे खतविक्री करण्याकरिता सहकार्य करावे. जेणेकरून कृषी निविष्ठाधारकांकडे उपलब्ध असलेले खत वरिष्ठ स्तरावरील कार्यालयाला माहितीकरिता सोयीचे होईल. बरेच शेतकरी आधार नंबर न घेता खतांची खरेदी करतात; परंतु अशाने कृषी निविष्ठाधारक संकटात सापडतात तेव्हा प्रत्येकाने आपापली बाजू कायद्याच्या चाकोरीत ठेवून खत खरेदी करावे, अशा स्पष्ट सूचना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले आहेत.
दर्शनीभागात खतांचा फलक साठा लावण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST