शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:56 IST

तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देरवींद्र भोसले : बेलगाव येथे शिबिराचे आयोजन, कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नियोजनास व अंमलबजावणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांची एकत्रितपणे काम करून ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक व अन्य कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले.कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २३ ते २५ ऑगस्टपर्यंत शेतकरी मानधन योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भंडारा तालुक्यातील बेलगाव येथे आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी आनंद पाल, कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी सहाय्यक हेमलता तिडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सहसंचालक भोसले यांनी अधिकाऱ्यांसह, शेतकऱ्यांना योजनेची यावेळी सविस्तर माहिती देवून शेतकरी माधन योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये असा इशारा दिला.तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांना १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांला ५५ रुपये तर ४० वर्ष वयाच्या शेतकऱ्याला २०० रुपये दरमहा हप्ता भरावा लागणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेइतकाच केंद्र शासन हप्ता भरणार असल्याने योजना फायदेशीर असल्याचे सांगितले.जिल्हा कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येणार असून वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये (निवृत्ती वेतन) देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नोंदणीसह आवश्यक कागदपत्रेग्रामपंचायतीसह सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन नोंदणी करावी. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले. योजनेत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद देखील या शेतकरी मानधन योजनेत करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना