शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

75 हजार व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर मे, जून आणि जुलै महिन्यात रुग्णांची संख्या कमी हाेती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढायला लागली.

ठळक मुद्देआरटीपीसीआर १९ हजार : ॲन्टीजेनमध्ये ८५१० तर आरटीपीसीआर मध्ये २७३८ पाॅझिटिव्ह

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काेराेना निदानासंदर्भात आतापर्यंत ९४ हजार ४२२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यात सर्वाधिक ७५ हजार ८७ व्यक्तींनी ॲन्टीजेन चाचणी केली आहे. ॲन्टीजेनमध्ये ८५१०, आरटीपीसीआरमध्ये २७३८ आणि टीआरयूएनएटी चाचणीत १२२ व्यक्ती असे एकूण ११ हजार ३७०व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला हाेता. त्यानंतर मे, जून आणि जुलै महिन्यात रुग्णांची संख्या कमी हाेती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. ऑगस्टमध्ये १०३६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. तर सप्टेंबरमध्ये ३९५८ व्यक्ती काेराेनाबाधित झालेत. नाेव्हेंबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात आरटीपीसीआर चाचणी साेबतच ॲन्टीजेन सुरु करण्यात आली. यामुळे तात्काळ निदान करणे शक्य झाले. भंडारा जिल्हृयात आतापर्यंत ९४४२२ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणी १९ हजार ५२ व्यक्तींचा समावेश आहे. त्यात २७३८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. ७५ हजार ८७ व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली असून त्यात ८५१० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहे तर टीआरयूएनएटी चाचणी २८३ व्यक्तींची करण्यात आली. त्यात १२२ व्यक्ती असे एकूण ११ हजार ३७० व्यक्ती  पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह काेविड केअर सेंटरवर चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

गुरुवारी एकाचा मृत्यू ७१ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात गुरुवारी ५६७व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले आहे. तर तुमसर तालुक्यातील ५९ वर्षीय व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये भंडारा २४, माेहाडी ५, तुमसर १८, पवनी २, लाखनी ४, साकाेली १३ आणि लाखांदूर तालुक्यात ५ रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी ६० व्यक्ती काेराेनामुक्त झाले असून आतापर्यंत दहा हजार ५०६ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात ई-संजीवनी ओपीडी सुरु करण्यात आली असून येथे आतापर्यंत १३४९ जणांनी लाभ घेतला आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाय केले जात आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या