शिक्षण विभागाने घेतली दखल : १ जुलैपासून सुरु होते उपोषणमोहाडी : मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळाबंद आंदोलन व आमरण उपोषण १ जुलै २०१६ पासून सुरु केले होते. या आंदोलनाची शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेवून शिक्षकांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. त्यांनतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ कुकडे, पंचायत समिती सदस्या निता झंझाड, खंडविकास अधिकारी लांजेवार, गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, शिक्षण विस्तार अधिकारी गणवीर, केंद्रप्रमुख डोकरीमारे, मुख्याध्यापक लिल्हारे, उपसरपंच विनोद वैद्य, ग्रामपंचायत सदस्य राधेश्याम गाढवे, अंकुश वैद्य, प्रतिष्ठीत नागरिक गोमा वैद्य, दुर्योधन ठवकर, फत्तू वैद्य, रामकृष्ण बागडे, सामाजिक कार्यकर्ता कैलाश झंझाड यांच्यासह गावातील नागरीक प्राम्ख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: July 4, 2016 00:30 IST