शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पशुसंवर्धन, शेतीपूरक व्यवसाय

By admin | Updated: February 23, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशूधन पाळणे ही काळाची गरज आहे. आर्थिक विकास व प्रगती होण्यास पशुधन आवश्यक आहे.

चरण वाघमारे : ५५ हजार २५० रुपयांचे बक्षिसांचे वाटपतुमसर : शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशूधन पाळणे ही काळाची गरज आहे. आर्थिक विकास व प्रगती होण्यास पशुधन आवश्यक आहे. आर्थिक सुबत्तेचे पशूधन हे प्रतीक आहे असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.तुमसर येथे आयोजित पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, तुमसर जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पशुप्रदर्शनी व गोपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जि.प. पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, कृउबा सभापती भाऊराव तुमसरे, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजू शहारे, पं.स. सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार उपस्थित होते. पशूप्रदर्शनीत निवडक जनावरांना गटाप्रमाणे रोख बक्षिस ५५२५० वाटप करण्यात आले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय तथा पशुसंवर्धन विषयक कार्य करणाऱ्या निवडक गोपालकांचा यावेळी सत्कार करण्यात आले. मुक्त गोठा पद्धत तथा पशूधन जोपासणे, त्याची काळजी घेण्याची यशस्वी पद्धत राबविल्याबद्दल तालुका पशुसंवर्धन अधिकारी तथा पशू प्रदर्शनीचे आयोजक डॉ.भाष्कर चोपकर यांच्या अतिथींनी सत्कार केला.गोपालकांकरिता कलापथक, प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. पशुप्रदर्शनी व गोपालक मेळाव्याला जि.प. सदस्य संदीप टाले, संगीता सोनवाने, प्रेरणा तुरकर, गीताताई माटे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, के.के. पंचबुद्धे, प्रतीक्षा कटरे, पं.स. सदस्य जितेंद्र सर्याम, राजेंद्र ढबाले, शिशुपाल गौपाले, बाळकृष्ण गाढवे, सुप्रिया राहांगडाले, अरविंद राऊत, रिना गौपाले, गुरुदेव भोंडे, हिरालाल नागपुरे, मुन्ना पुंडे, रोषणा नारनवरे, मंगला कनपटे, विमल कानतोडे, संगीता मरसकोल्हे, साधना चौधरी, रेखा धुर्वे, डॉ.विवेक इटनकर, सह कर्मचारी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)