शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

संतप्त जमावाने तीन टिप्पर पेटविले

By admin | Updated: June 23, 2017 00:18 IST

शिकवणी वर्ग आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले.

बोरगाव येथील घटना : भरधाव टिप्परने विद्यार्थिनीला चिरडलेलोकमत न्यूज नेटवर्कपवनी/विरली/आसगाव/पालोरा : शिकवणी वर्ग आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले. ही घटना लाखांदूर-पवनी मार्गावरील बोरगाव येथे गुरूवारला दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त जमावाने रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर पेटविले. यावेळी पोलीस व्हॅन आणि अग्निशामक दलाच्या वाहनावरही जमावाने दगडफेक करून रोष व्यक्त केला.प्राची मोतीराम मांडवकर (१६) रा.मांगली (चौ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. आसगाव येथून खासगी शिकवणी वर्ग आटोपून ती आपल्या तीन मैत्रिणीसह सायकलने मांगलीला परत येत होती. दरम्यान इटान रेती घाटातून रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने (क्र.एमएच ४० वाय ९५१२) मांगली फाट्यावर तिला चिरडले. यात तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. तिचा मेंदू घटनास्थळापासून २५ फूट अंतरावर जावून पडला. यावेळी घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी दुचाकीचा टिप्परचा पाठलाग करून आसगावजवळ टिप्पर अडविला. त्यानंतर संतप्त जमावाने हा टिप्पर पेटविला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी या मार्गाने रेती वाहतूक करणारे अन्य दोन टिप्पर अडवून त्यांनाही पेटविले. अपघाताची माहिती मिळताच पवनीचे ठाणेदार सुनील ताजने हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस वाहनावर दगडफेक करून रोष व्यक्त केला. यावेळी आलेले अग्निशमन दलाचेही वाहन ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडले. शेवटी पोलिसांची वाढीव कुमक मागवून संतप्त ग्रामस्थांना पांगविण्याचा प्रयत्न केला.घटनेचे गांभीर्य ओळखून पवनीचे तहसिलदार कोकार्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातामुळे लाखांदूर-पवनी मार्गावरील वाहतूक सुमारे ५ तास ठप्प होती. संतप्त ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे घटनास्थळावरून मृतदेह उचलू देण्यासाठी ग्रामस्थांनी नकार दर्शविला होता. सायंकाळी ५.३० पर्यंत घटनास्थळी तणावाची स्थिती होती. आ. रामचंद्र अवसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रूपयांचा धनादेश दिला. आणि वैयक्तिक १ लाख रूपये मदत करण्याची घोषणा आ.अवसरे यांनी केली. त्यानंतर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत मृतदेह उचलण्यात आला.रेती घाट बंद करा या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेविरूद्ध तीव्र असंतोष खदखदत होता. ग्रामस्थांनी या परिसरातील इटान, इसापूर, उमरी (चौ.) हे रेती घाट बंद करावे. मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि पवनीचे तहसीलदार व ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रास्ता रोको करून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.दोन महिन्यांमध्ये पाच बळीलाखांदूर-पवनी मार्गावर रात्रंदिवस चालणाऱ्या ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर अपघातामुळे आजवर अनेकांचा बळी गेला आहे. तुमसर तालुक्यातील चारगावसह अन्य रोतीघाटांवर रेतीची खुलेआम चोरी सुरू आहे. लिलावादरम्यान घातलेल्या अटी आणि शर्थीचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. महिनाभरापूर्वी लाखांदूर तालुक्यातील विरली (बुज) येथील सुनिता महावाडे या महिलेचा टिप्परने बळी घेतला. त्यानंतर दोन दिवसातच पवनी-अड्याळ मार्गावर लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांचा टिप्परच्या धडकेने घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसातच सिंदपुरी फाट्यावर कामाक्षीअम्मा रामसागर रा.कोंढा (कोसरा) या महिलेचा टिप्परच्या मागील चाकात दबल्या गेली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांचे पती गंभीररीत्या जखमी झाले होते. आणि आज गुरूवारला प्राची मांडवकर या शाळकरी मुलीचा टिप्परने बळी घेतला. मागील दोन महिन्यात रेती वाहतुकीने याच मार्गावर चार बळी घेतले. आतातरी कुणी पुढाकार घेणार की नाही, प्रशासन जागे होणार की नाही, रेतीची ही वाहतूक आणखी किती बळी घेणार? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.