शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अन् संतप्त शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

तुमसर : कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत ...

तुमसर : कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, बाजारात कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली. या प्रकाराने हतबल झालेल्या तालुक्यातील खरबी येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील उभ्या टोमॅटो पिकात ट्रॅक्टर चालविला. अक्षय तृतीयेच्या दिवशी या शेतकऱ्याने उचललेले पाऊल शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे वास्तव होय.

आनंद सिंगनजुडे, रा. खरबी, असे शेतकऱ्याचे नाव आहे. आनंद सिंगनजुडे हे गावचे सरपंचही आहेत. खरबी-विहीरगाव शेतात तीन एकर शेतीत टोमॅटोची लागवड केली होती. पाण्याचा योग्य वापर व्हावा या उदात्त हेतूने ठिबक सिंचनचा उपयोग करीत होते. एक लाख रुपयांचे टोमॅटो रोपे एका कृषी प्रोड्युसर कंपनीकडून खरेदी केली होती. मजुरांच्या मदतीने लागवड करण्यात आली. दरम्यान, विविध बँका, सावकार व हातउसने स्वरूपात पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

कोरोनाच्या सावटात बाजारात टोमॅटोला योग्य भाव मिळत नव्हता, तर आता संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. मागेल त्या भावात ग्राहकांना टोमॅटो गावात विकावे लागत आहेत. टोमॅटोच्या बागेतील टोमॅटो रोपे लागवड, मजूर, ठिबक सिंचन संच, मशागत, रोगांवर नियंत्रणासाठी महागडी औषधी व फवारणी खर्च आवाक्याबाहेर जात पाच लाख रुपये खर्च केले. मात्र, टोमॅटोच्या बागेतून उत्पादन व लागवडीचा खर्च निघेनासा झाला. पाच लाख रुपये खर्च करून एक लाख रुपयेही नफा कमाविता येत नसल्याने हतबल शेतकऱ्याने शुक्रवारी टोमॅटोच्या शेतीत चक्क ट्रॅक्टर नांगर चालवून बाग उद्‌ध्वस्त केली. शेतात राबराब राबून भाजीपाला विकण्यासाठी सध्या गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. त्यानंतरही मोठे नुकसान होत आहे. अशी अवस्था एकट्या आनंदचीच नाही, तर जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांची आहे.

कोट

नागपूर येटून टोमॅटोचे रोपटे खरेदी करून तीन एकरांत लागवड केली. यंदा कोरोनाच्या सावटात बाजारपेठा बंद, उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात टोमॅटो तोडणीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. नाइलाजाने तीन एकरांतील टोमॅटोच्या बागेत ट्रॅक्टरने नांगर चालवून पीक उद्‌ध्वस्त करावे लागले.

आनंद सिंगनजुडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.