प्रामाणिकता कायम : ठिय्यावर जाऊन दिले शंकर देशमुख यांनी सोने, चांदी व रोख रक्कमतुमसर : एसटीच्या प्रवसादरम्यान परप्रांतीय मेंढपाळाचे सोन्याचे दागिने, एटीएम कार्डसह २४ हजार ५०० ची रोख रक्कम गहाड झाली. ती शंकर देशमुुख यांना सापडली. त्यांच्यातील प्रामाणिकता जिवंत असल्याने सापडलेली सर्व रक्कम व दागिने मेंढपाळाच्या ठिय्यावर जाऊन दिली. देशमुख यांच्या प्रामाणिकतेमुळे मेंढपाळांच्या कुटुंबाचा डोळ्यात आनंदाश्रू आले. आजही प्रामाणिकता जिवंत आहे याचा प्रत्यय तुमसरातील इंदिरा नगर निवासी शंकर नारायण देशमुख यांनी दाखवून दिला. देशमुख तुमसर येथून रामटेकला जाण्याकरिता बसमध्ये बसले. त्यांच्या बाजूलाच गुजरातमधील मेंढपाळ महेंद्रसिंह माना बसले होते. हिंगणा शिवारात महेंद्रसिंग बसखाली उतरले. दरम्यान त्यांच्या डोक्यावरील फेटा बसमध्येच विसरला. बस सुटल्यानंतर काही वेळाने तो फेटा शंकर देशमुख यांना दिसला. उत्सुकतेपोटी देशमुख यांनी फेटा बघितल्यावर त्यात बँकेची पुस्तक, एटीएम कार्ड, २४ हजार ५०० रोख, हातातील सोन्याच्या दोन बांगड्या, चांदीचे कडे दिसले.देशमुख यांनी तो त्या मेंढपाळाला परत करण्याचे ठरविले. हजारो किमींचा पायी प्रवास करुन ते पोटासाठी भटकंती करतात, असे विचार देशमुख यांच्या मनात आले. शंकर देशमुख हिंगणा येथे आले. मेंढपाळाचा ठिय्या त्यांनी शेतशिवार फिरुन शोधून काढला. देशमुख यांनी महेंद्रसिंग यांना रोकड व दागिणे परत करताच महेंद्रसिह यांची पत्नी फुलवंता यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हरविलेले साहित्य व रोख परत केल्याबद्दल यांना दाम्पत्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी हिंगणा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अन् मेंढपाळाचे डोळे पाणावले
By admin | Updated: August 23, 2015 00:50 IST