शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अन् मुलाच्या नोकरीची इच्छा राहिली अपुरी

By admin | Updated: June 18, 2017 00:22 IST

सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची ...

प्रकरण जांभोरा येथील शेतकरी आत्मदहनाचेयुवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सततच्या नापिकीमुळे ताराचंद भदरू शेंदरे या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात स्वत:चे सरण रचून जाळून घेतल्याची वेदनादायक तितकीच दुदैवी घटना १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ताराचंद यांचा एकुलता मुलगा मुलचंद हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून बेरोजगारीमुळे रोहयो कामावर जातो. शासनाचे वतीने अंशकालीन कर्मचाऱ्यांचे डाटा बेस करण्यात आल्याने मुलाला नोकरी लागून चांगले दिवस येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ताराचंदचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृतक ताराचंद शेंदरे यांची अडीच एकर शेती जांभोरा शेतशिवारात एकलकाझरी परिसरात आहे. मागील वर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती रोवणी अभावी पडित राहिल्या. शेती कसण्यासाठी त्यांनी नातेवाईक व अन्य लोकांकडून त्यांनी पैसे उसनवार मागितले होते. वारंवारच्या नापिकीमुळे तो त्रस्त होता. निसर्ग जगू देत नाही, अन मरू देत नाही, अशी त्याची अवस्था होती. घटनेच्या दिवसी तो रोजच्या प्रमाणे घरून निघून गेला. परंतू सायंकाळ होवूनही घरी न परतल्याने मुलाने शोध केली असता वडिलाचे मृत शरीर तणसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे अवस्थेत मिळून आला. घटनेच्या माहिती त्याने सरपंच व ग्रामस्थ व नातेवाईकांना दिली.मुलांनी फोडला हंबरडाशवविच्छेदनासाठी ताराचंद यांचा मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी पार्थिव घरी पोहचताच जमलेल्या नातेवाईकांनी, मुलांनी फोडला हंबरडा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या. सर्वांनी साश्रूपूर्ण नयनांनी ताराचंदला जांभोरा येथील सागर तलाव स्मशानभूमित अखरेचा निरोप दिला. शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकही अधिकारी व पदाधिकारी अंत्ययात्रेकडे फिरकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे. अंत्ययात्रेला सरपंच भुपेंद्र पवनकर, सुरेश बिसने, ग्रामपंचायत सदस्य राजघर शेंडे, संजय शहारे व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफिची तत्काळ अंमलबजावणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. कर्जमाफीचे निकष शेतकऱ्यांसाठी कर्दणकाळ ठरणारे आहेत. तृतकाचे परिवाराला मदत व सुशिक्षित पदवीधर अंशकालीन बेरोजगार मुलाला नोकरी देण्याची आवश्यकता आहे, असल्याची प्रतिक्रीया जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी दिली.