शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रुग्णवाहिका चालक अडकला चक्रव्यूहात

By admin | Updated: October 18, 2014 22:59 IST

आरोग्य सेवा देण्यासाठी धडपडणारे रुग्णवाहिका वाहन चालक अनेक समस्यांच्या चक्रव्युहात अडकला आहे. परिणामी त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावणारा आहे. त्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे,

भंडारा : आरोग्य सेवा देण्यासाठी धडपडणारे रुग्णवाहिका वाहन चालक अनेक समस्यांच्या चक्रव्युहात अडकला आहे. परिणामी त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावणारा आहे. त्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे, अन्यथा कुटुंबासह बेमुदत उपोषणाचा इशारा एनआरएचएम अंतर्गत असलेल्या कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.आपीएसएस प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वाहन चालकांच्या नियुक्त्या रुग्णकल्याण समितीमार्फत दि.१ आॅगस्ट २०१४ पासून प्रतिमाह वेतन आठ हजार रूपये प्रमाणे करण्यात आले. परंतु दोन महिन्याचे वेतन वाहन चालकांना मिळालेले नाही.वाहन चालक २४ तास रुग्णांना आमच्या जिवाची व कुटुंबाचा विचार न करता रात्री अहोरात्री ग्रामीण भागात कोणत्याच प्रकारची भिती न बाळगता रुग्णांना घरून उपकेंद्र ते प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे सोईनुसार पोहचवितात. सर्व वाहन चालक सन २००९ पासून आजपर्यंत सुरळीतपणे कंत्राटी एनआरएचएम अंतर्गत तथा रुग्णकल्याण समितीमार्फत अशा प्रकारे पाच वर्षापासून रुग्णांना सेवा देत आहोत. त्यामध्ये जेएसके अंतर्गत एएनसी व पीएनसीकेसेस घरून आणने परत सोडणे, मानव विकास कार्यक्रम कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केसेस भरती करणे परत घरी सोडणे, जनरल पेसंट सोडणे, वैद्यकीय अधिकारी यांचे आदेशाने यांचेसोबत ग्रामपंचायत भेटी, उपकेंद्र भेटी, अंगणवाडी भेटी व शासनाचे वेळेवर येणारे उपक्रम यांचेमध्ये सेवा देतात.वेतन प्रतिमहा ८ हजार प्रमाणे रुग्णकल्याण समितीमार्फत त्वरीत दिवाळीपूर्वी देण्यात यावी. वाहन चालकांना तुटपुंज्या वेतनावर आई, वडील, पत्नी, मुले यांचे पालन पोषण, औषधउपचार, शिक्षण आपल्या कडून मिळत असलेल्या रूपये ८ हजार वेतनावर करावा लागतो. त्यांच्या व्यथा समजून समस्याकडे लक्ष केंद्रित करून कुटुंब जगविण्यासाठी व जगण्यासाठी वेतन शिघ्रगतीने देण्यात यावे.वाहन चालकांच्या जीवनाची एक प्रकारची शासन प्रशासन थट्टाच करीत आहे. केंद्रातील एनपीसीसी समितीच्या निर्णयानुसार व आपल्या आदेशानुसार रुग्णकल्याण समितीमार्फत वाहन चालकाची निवड करून दिनांक १ आॅगस्ट २०१४ पासून पगार वाढीच्या खुशीखुशीने सर्व वाहनचालक रुग्णांना सेवा देत आहेत.शासनाच्या एनपीसीसी समितीने ठरवून दिलेल्या रूपये आठ हजार वेतन आम्हाला त्वरित देण्यात यावा, दोन महिने १० दिवस रुग्णकल्याण समितीमार्फत काम केलेले आहे. मागील प्रमाणे रूपये सहा हजार वेतनावर काम करणे हा अन्याय का, आम्ही रुग्णकल्याण समितीने ठरवून दिलेले वेतन आठ हजार रूपये प्रतिमाह प्रमाणेच घेणार अन्यथा कमी वेतन घेणार नाही, असा निर्णय वाहनचालकांनी घेतला आहे. चालकांच्या व्यथा लक्षात घेता समस्याचा निराकरण करून अतिदक्षतेने न्याय मिळवून द्यावा अन्यथा २० आॅक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ आॅक्टोबर ला जिल्हा परिषद भंडारा येथे सर्व वाहनचालक कुटुंबासहित आमरण उपोषण करण्याचा इशारा वाहन चालकांच्या संघटनेनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)