शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रुग्णवाहिका चालकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:56 IST

२४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेवर मोर्चा : समस्या निकाली निघेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला. सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेवरमोर्चा काढला.आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य उपकेंद्रात रुग्णांना पोहचविण्याचे कार्य रुगणवाहिका चालक सातत्याने करीत आहेत. कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या या रुग्णवाहिका चालकांना प्रतिमाह ८ हजार ४०० रुपये मानधन दिले जात आहे. तुटपूंजे मानधनावर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यातच वेळेवर व नियमित वेतन मिळत नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबना होत आहे.वारंवार शासन प्रशासनाला कळवूनही चालकांच्या समस्याला वाचा फुटलेली नाही. चालक महाराष्टÑ राज्यात रुग्णांना सेवा देत असताना कंत्राटदार मात्र मध्यप्रदेशातील नेमण्यात आला. वरिष्ठ अधिकारी मजेत असताना रुग्णवाहिका चालकांची अल्पशा मानधनामुळे फरफट होत आहे. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील जवळपास ४५ रुग्णवाहिका चालकांनी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यावेळी परमानंद मेश्राम यांनी वाहनचालकांसह आरोग्य सेविकांवर होणाºया अन्यायाचा पाढा वाचला. शासन समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र जगताप यांनी निवेदन स्विकारावे अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र ते उपलब्ध नसल्याने दुसºया सक्षम अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारण्याचे सौजन्य यावेळी दाखविले नाही. परिणामी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलकांनी पोलीस उपनिरीक्षक गेडाम यांना निवेदन देवून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे, आशिष लांजेवार, महेंद्र मेश्राम, अविनाश फुले, योगेश कारेमोरे, अमोल बरडे, गणेश भरारे, नितीन राऊत, मदन बुराडे, गौरीशंकर गिºहेपुंजे यासह अन्य वाहन चालकांचा समावेश होता. या आंदोलनाला महाराष्टÑ राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पाठींबा दिला होता. यावेळी संघटनेचे उपमहासचिव सुर्यभान हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, हरिशचंद्र धांडेकर, सिध्दार्थ भोवते आदी उपस्थित होते.कित्येक वर्षांपासून रुग्णवाहिका चालकांवर सातत्याने अन्याय होत आहे. शासन व प्रशासनातील अधिकारी यांच्या समस्या सोडवायला कानाडोळा करीत आहेत. गोरगरीबांचा हक्क हिरावला जात असून या अन्यायाला आम्ही कदापी खपवून घेणार नाही. सदर रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटेपर्यंत लढत राहू.- परमानंद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता भंडारा

टॅग्स :zpजिल्हा परिषदMorchaमोर्चा