शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

सर्वांगीण विकास हे युती शासनाचे ध्येय

By admin | Updated: February 26, 2016 00:43 IST

जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे.

पालकमंत्री सावंत यांचे प्रतिपादन : लाखांदूर तालुक्यात कामांचे भूमिपूजन व लोकार्पण लाखांदूर : जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे. गावांच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून जनतेच्या विश्वासाला युती सरकार तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील ओपारा पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर आमदार राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, पं.स. सभापती मंगला बगमारे, नगराध्यक्षा नीलम हुमणे, नगरपंचायत उपाध्यक्ष नरेश खरकाटे, सरपंच राजू राऊत, उपसरपंच राहुल राऊत, सभापती विनायक बुरडे, जि.प. सदस्य प्रदीप बुराडे, मनोहर राऊत उपस्थित होते.यावेळी आमदार काशिवार म्हणाले, मतदारानी पहिली पसंती दिल्याने विकासकामातून ऋण फेडणार असल्याचे सांगून यापुढेही गावात विविध विकासकामे केली जातील. विधानसभा क्षेत्र विकास कामापासुन वंचित राहनार नाही. शेतकरी सर्वसामन्यांच्या अडचणी तसेच युवकाना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले, पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून जनतेला रहदारीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. प्रारंभी दिघोरी (मोठी) येथे जिल्हा वार्षिक योजनेतून १४७.९७ लाख रूपये निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, निवासस्थानाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे, पं.स. सदस्य गुलाब कापसे, सरपंच शंकर खराबे उपस्थित होते. लाखांदूर येथील राज्य पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाखांदूर नगरपंचायत अध्यक्षा नीलम हुमणे, उपाध्यक्ष नरेश खरकाटे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ना.सावंत यांनी इमारत बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण ताफा ग्रामीण रूग्णालयात अचानक धडकला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पालकमंत्र्यांनी ग्रामीण रूग्णालयातील रूग्णाची आस्थेने विचारपूस केली. प्रत्येक वार्डात जाऊन तपासणी केली. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील रंगारी यांच्या संदर्भात तक्रारी असून त्या खपवून घेण्यात येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी डॉ. रंगारी यांना ठणकावून सांगितले. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगली सेवा देण्याची सूचना त्यांनी केली. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळाही त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी डाक्टरांनी चांगली वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आवाहन करून पूर्वी रूग्णसेवा प्रामाणिकपणे डॉक्टर करायचे मात्र आता सरकारी दवाखान्याऐवजी डॉक्टर खासगी सेवेत जात रस घेताना दिसत असाल्याची खंत व्यक्त करीत शासकीय सेवेत असतांना डाक्टरांनी जनतेला आपलेसे करा व चांगले नाते जोडा असे आवाहन केले. यावेळी आमदार बाळा काशिवार यांनी विविध समस्या पालकमंत्र्यांना सोडविण्याची विनंती केली. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, नगर पंचायत सदस्य, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतीनिधी)