शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

क्रीडा स्पर्धेतून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवा

By admin | Updated: December 2, 2015 00:31 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शारिरिक क्षमतेचे वरदान लाभले आहे. या क्षमतेला शिस्त, समर्पण, निर्धार, सहनशीलता, चिकाटी आणि ....

माधवी खोडे यांचे आवाहन : विभागीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभभंडारा : आदिवासी विद्यार्थ्यांना शारिरिक क्षमतेचे वरदान लाभले आहे. या क्षमतेला शिस्त, समर्पण, निर्धार, सहनशीलता, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची जोड दिल्यास खेळाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी आपले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवू शकतात, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुलात आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, प्रकल्पस्तरीय नियोजन समितीचे अध्यक्ष बिसन सयाम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे उपस्थित होते. यावेळी अतिथींच्या हस्ते मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. क्रीडा स्पर्धेमध्ये देवरी, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली आणि भंडारा चमुच्या खेळाडुंनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते दौड स्पर्धेची फीत कापून दौड स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.खोडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमतेसोबतच मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे. यातुन जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नागपूरला विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करुन देण्यात येणार आहे. चमू जिंकण्यासाठी खेळाडुवृत्ती ठेवा. नागपूर विभागातील चमूने आॅलिम्पिक स्पर्धेतही चमकावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट क्रीडा गुण असल्यामुळेच २,३३० खेळाडू सहभागी झाले आहेत. आदिवासी समाजाची विजयी पताका हे विद्यार्थी कायम फडकावत राहतील. राज्यघटनेत आदिवासींसाठी विशेष तरतूद केली आहे. त्याचा लाभ घेऊन आदिवासी बांधवांनी विकासाच्या प्रक्रियेत यावे, असे आवाहन केले.यावेळी बिसन सयाम म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील शारीरिक क्षमतांचा उपयोग केल्यास आदिवासी समाज देशात लौकिक निर्माण करेल. विद्यार्थ्यांनी खेळाडुवृत्ती जोपासून खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप झळके मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गडचिरोली आणि देवरी येथील खेळाडूंनी आदिवासी नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तीन दिवसीय या क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाच्या आठ प्रकल्पातील २,३३० खेळाडु सहभागी झाले आहेत. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धाव स्पर्धा आदी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यावेळी अहेरी, भामरागडचे प्रकल्प अधिकारी सोनकवळे, चंद्रपूरचे वानखेडे, चिमूरचे चौधरी, गडचिरोलीचे राचलवार, देवरीचे रघुते व क्रिडा प्रशिक्षक, क्रीडा परिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)