शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अधिसूचित सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:29 IST

भूमिअभिलेख कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवाबाबत माहिती जाणून घेतली. गणेशपूर ग्रामपंचायतीतील भेट देवून त्यांनी पाहणी केली. या कार्याबाबत नागरिकात व्यापक जनजागृती करण्याची सूचना दिली. अधिसूचित केलेल्या ४८६ सेवांची माहिती जिल्ह्याच्या तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.

ठळक मुद्देस्वाधिन क्षत्रिय : मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या विविध विभागाच्या सेवा विहित मुदतीत नागरिकांना देण्यासाठी लोकसेवा हमी हक्क कायदा राज्यात लागू केला आहे. या कायद्यांतर्गत अधिसूचित केलेल्या ४८६ सेवा नागरिकांना देण्यासाठी सर्व सेतू सुविधा केंद्रावर अर्ज स्विकारावे, अशी सूचना मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी येथे दिल्या.भंडारा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र, उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, भूमिअभिलेख कार्यालय, गणेशपूर ग्रामपंचायत आणि भंडारा जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, मनिषा कुरसंगे, भूमिअभिलेख अधीक्षक एम.बी. पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते.लोकसेवा हक्क कायद्या प्रभावी अंमलबजावणीची पाहणी स्वाधिन क्षत्रिय यांनी बुधवारी केली. प्रशासकीय इमारतीतील सेतू सुविधा केंद्राला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर नगरपालिका कार्यालयाला भेट देवून विविध सेवांचा आढावा घेतला. भूमिअभिलेख कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवाबाबत माहिती जाणून घेतली. गणेशपूर ग्रामपंचायतीतील भेट देवून त्यांनी पाहणी केली. या कार्याबाबत नागरिकात व्यापक जनजागृती करण्याची सूचना दिली.अधिसूचित केलेल्या ४८६ सेवांची माहिती जिल्ह्याच्या तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. या सेवांपैकी महत्वाच्या तसेच वारंवार मागणी होणाऱ्या २० सेवांची यादी सेतू सुविधा केंद्रावर प्रसिद्ध करावी, असे त्यांनी सांगितले.३९८ सेवा ऑनलाईनअधिसूचित केलेल्या ४८६ सेवांपैकी ३९८ सेवा ऑनलाईन असून उर्वरित सेवा ऑफ लाईन आहे. या सेवाही लवकरच ऑनलाईन करण्यात येतील, असे स्वाधिन क्षत्रिय यांनी सांगितले. सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्विकारावे, असा शासन निर्णय नगरविकास खात्याने निर्गमित केल्याचे ते म्हणाले. सेवा हक्क हमी कायद्याची सेवा अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी हे अ‍ॅपलीकेशन डावूनलोड करावे, असे त्यांनी सांगितले.