शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
3
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
4
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
5
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
6
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
7
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
8
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
9
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
10
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
11
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
12
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
13
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
14
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
15
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
16
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
17
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

नावातच असतं सगळं काही !

By admin | Updated: March 2, 2015 00:43 IST

नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते.

लोकमत सर्व्हेक्षणभंडारा : नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते. मुलाचे नामकरण करताना अधिक सजगपणे पालक नावाची निवड करतात, याची प्रचिती ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली. होय, नाही, सांगता येत नाही, स्वत:चे नाव प्रत्येक महिलेला आवडते की नाही, हे पाहणेही रंजक ठरले. स्वत:चे नाव आवडणाऱ्या महिलांची संख्या ६४ टक्के तर नाव आवडत नसल्याची तक्रार ३६ टक्के महिलांनी केली. नाव आवडण्यामागे सर्वच महिलांनी एकमेव कारण सांगताना आपल्या आईवडीलांनी हे नाव ठेवलेले असल्याने ते अधिक आवडते असे सांगितले. नकारात्मक उत्तर देणाऱ्या महिलांनी त्यांच्या नावात शेवटी बाई असा उल्लेख असल्याने नाव उच्चारताना जरासे कसेतरी वाटते, असे सांगत या नावाऐवजी आपले अमुक नाव असते तर बरे झाले असते, असे सांगून टाकले. स्वत:च्या नावाबद्दल जसे अगदी स्पष्टपणे महिलांनी आपली मते नोंदविली. ४६ टक्के महिलांना त्यांच्या घरात टोपननाव आहे आणि त्या नावानेच त्यांचा उल्लेख होत असतो तर ५४ टक्के महिलांनी आपल्याला असे टोपन नाव नसल्याचे सांगितले. महिलांना एकदा नाव बदलण्याचा चॉईस असतो. लग्नानंतर त्यांचे आडनाव जसे बदलून जाते तसेच त्यांचे नावही अनेकदा सासरची मंडळी बदलून टाकतात. लग्नानंतर स्वत:चे नाव बदलून टाकलेल्या महिलांची संख्या आहे ३७ टक्के तर ६३ टक्के महिलांचे नाव मात्र लग्नानंतरही तेच कायम असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. साठ ते सत्तरच्या दशकात हिंदी आणि मराठी चित्रपटांचा पगडा समाजमनावर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अर्थातच मुलांच्या नामकरणावर झाला. मुलांची देवदेवतांची नावे काळाच्या ओघात काहीशी मागे पडली आणि त्याची जागा चित्रपटातील आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्यांच्या नावाने पालकांच्या मनाची पकड घेतली. त्यामुळे मुलांचे नामकरण बबिता, साधना, रेखा, संजय, अमित, मिथून, इथपासून ते अगदी जया, संजीवकुमार, डॉली, इथपर्यंत झाले. ५० वषार्पूर्वीचा किंवा त्या आधीचा काळ हा समाजावर धार्मिक पगडा खूप मोठा असलेला काळ होता. त्यामुळे अर्थातच आपल्या मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवताना पालकांचा ओढा देवदेवतांची किंवा संतांच्या नावाकडे अधिक असायचा. राम, कृष्ण, सीता, द्रोपदी, मुक्ताई, ज्ञानदेव अशा आशयाची नावे असायची. पती किंवा पत्नीच्या आद्याक्षरावरून आपल्या पाल्याचे नाव पालक ठेवतात. नावात काळाप्रमाणे बदल झाले असले तरी आद्याक्षरांना महत्त्व आजही पालक देताना दिसतात. (लोकमत चमू)